छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मागणाऱ्या सरकारला शिवरायांच्या कायद्याचा पडला विसर..!
सोलापूर (दादासाहेब नीळ):- सध्या संपूर्ण देशामध्ये आणि राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना ंमध्ये वाढ होताना दिसत आहे. मताच्या लालसेपोटी ही सरकार अशा घटना करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचं नागरिकांमधून बोलवले जात आहे.आजच्या घडीला जेवढे कायदे क** आहेत तेवढ्या पळवटाही शोधून काढले आहेत. त्यामुळेच कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करताना कोणी दिसत नाही. महिला आणि मुलींवर सध्या अत्याचार करणारे बुरशीटलेल्या विचारसरणीचे नाराधम आणि त्यांना सरकारचं मिळत असलेलं पांघरून यामुळेच हे गुन्हेगार उजळ माथ्याने समाजामध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन हे राजकीय नेते सरकार मध्ये निवडून येतात. परंतु छत्रपती शिवरायांचा विचार आणि कायदा मात्र हे सरकारच पाळत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा उच्छाद मांडलेला दिसतोय. वास्तविक पाहता गुन्हेगारांना कायद्याची कसलीच भीती उरलेली नसल्यामुळेच अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी बऱ्याच मुली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करण्यासाठी तयार होत नाही आणि त्यामुळेच सध्या गुन्हेगारांचं बळ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळेच महिलांना आणि मुलींना आम्हीच दाखवणं बळजबरी करणे धमकावणे बसवणे मुंगीच्या औषध देऊन मोबाईलवर चित्रपट तयार करून सार्वजनिक अर्थात व्हायरल करणे अशा प्रकारची भीती घालून अत्याचार करण्याचे प्रमाण इमोशनल ब्लॅकमेल करून केली जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेवर सर्वत्र चर्चा होतात पडसाद उमटतात बातम्या येतात परंतु त्यानंतर मात्र सर्वजण विसरून जातात . हे वास्तव नाकारता येत नाही. पुन्हा एखादी अशीच काळी कुठे घटना घड़ेपर्यंत सर्वजण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसतात.त्यानंतर पुन्हा काट्याकोट करतात हे असं किती दिवस चालणार..?
असा प्रश्न सध्या महिलांमधून विचारला जातो आहे.
गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना चाप बसवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा कायदा सरकारने अमलात आणावा लागेल .आणि महिलांकडे वाकडे नजरेने बघणाऱ्यांचा रांझाचा पाटील अर्थात चौरंग करावा लागेल.तरच अशा घटनांना ब्रेक लागेल अन्यथा गुन्हेगाराचं आणि गुन्हेगारीचं बळ वाढतच राहील यात दुमत नाही.
.jpg)
No comments:
Post a Comment