आंदोलन कर्त्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यात रास्ता रोको, 2 एसटी बसच्या काचा फोडल्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

आंदोलन कर्त्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यात रास्ता रोको, 2 एसटी बसच्या काचा फोडल्या

 आंदोलन कर्त्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यात रास्ता रोको,

 2 एसटी बसच्या काचा फोडल्या


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अंतरावली येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकावर झालेल्या हल्ल्याची धग रविवारी ही कायम दिसुन आली. रविवारी मोहोळ तालुक्यातील देगाव, कामतीबु॥, बेगमपूर, आष्टी, पेनुर,टाकळी सिकंदर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली, तर यल्लमवाडी फाटा व मोहोळ बस स्थानकात एसटी वर अज्ञात इसमांनी काठी व दगड मारून काचांची तोडफोड केली,तर शेटफळ मध्ये बंद पाळण्यात आला.

आंदोलका वरील हल्ल्याचा सकल मराठा समाजाच्या मनात राग दिसून आला. शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, तालुका स्तरावर वस्तीगृह निर्माण करावे, तसेच या हल्ल्यातील दोषीवर कारवाई करावी अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण, प्रदीप झालटे यांनी निवेदने स्वीकारली.

दरम्यान एमएच 14 बीटी 2718 ही बस मोहोळ बस स्थानकात येत असताना, अनोळखी व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधून हातातील काठीने समोरच्या काचेवर मारून तोडफोड केली. तर एसटी क्रमांक एमएच 06 8272 ही बार्शी ते सौंदणे जाताना ती यल्लमवाडी फाट्याजवळ येताच अनोळखी व्यक्तीने वाहकाच्या पाठीमागील खिडकीच्या वर दगड मारून काचेची तोडफोड केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages