मराठा बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा - विजया भोसले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

मराठा बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा - विजया भोसले

 मराठा बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा - विजया भोसले


वैराग (कटूसत्य वृत्त):- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या लाठीमारानंतर राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले. त्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या विजया भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका पत्रानुसार केली आहे मराठा समाजाने संविधानिक  मार्गाने आंदोलन चालू असताना देखील पोलिसांनी  घेराव घालत अमानुष  लाठीचार्ज केला हे कृत्य अत्यंत निंदनीय असून मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी शासनाने लवकरात लवकर निलंबन करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी  मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अतिशय शांततेत आणि शिस्तीत केलेल्या आंदोलनाची दखल संपुर्ण विश्वाने घेतली आहे. आजही आपण आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहोत. शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज निषेधार्य आहे. त्याचा तिव्र निषेध व्यक्त करत आहोत व या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, आजवर मराठा समाज अतिशय संयमाने वागलेला आहे समाजातील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आरक्षण महत्वाचे आहेच त्याचबरोबर मराठा आंदोलक तरुणांवर कोणतेही गुन्हे नोंद होवू नयेत अशी मागणी  विजया भोसले यांनी यावेळी केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages