सोलापूर जिल्ह्यास तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन: भारत राष्ट्र समिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरं जावं लागत आहे.अशा वेळेस शासनाने सोलापूर जिल्ह्यास दुष्काळ जाहीर करावा,ह्या प्रमुख मागणी सोबत आणखी सहा मागण्यांचे निवेदन भारत राष्ट्र समिती च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सौ शमा पवार यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा एकमेव पक्ष म्हणजे भारत राष्ट्र समिती असून यंदा गरीब शेतकऱ्याला दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते श्री नागेश वल्याळ,श्री सचिन सोनटक्के, श्री जयंत होलेपाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.यांच्या समवेत श्री अनिल बर्वे , श्री तुकाराम शेंडगे श्री आनंद देशमुख श्री सुरज डवले श्री प्रकाश मरगल,श्री अजित सोनकटले मोहसीन शेख,हाजी शहनावाज शेख,करीम सैय्यद,आखलाक मशालकर,अश्रफ शेख, अझहर नदाफ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:
Post a Comment