मोदी सरकारचा निवडणुकीवर "डोळा."...!
दोनशे रुपयांनी गॅस केला " भोळा"...!!
निवडणुका झाल्यावर पुन्हा खोऱ्यानं गोळा.....!!!
सोलापूर (दादासाहेब नीळ):- केवळ लोकसभा आणि चार राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडर दरात दोनशे रुपयाची कपात केल्या असून उज्वला लाभार्थींसाठी चारशे रुपयांची कपात करून देशभरातील बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली असल्याचा गवगवा दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.
वास्तविक पाहता गेल्या नऊ वर्षापासून देशातील महागाईचा टक्का कमी न होता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरड मोडलं आहे. असं असताना अचानकपणे गॅस सिलेंडरच्या दरात दोनशे रुपयाची कपात करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. या देशांमध्ये विजय मल्ल्या आणि निरव मोदी तसेच इतर अनेक उद्योगपतींनी करोडो रुपयांची कर्ज घेऊन अखेर देश सोडून पळून गेले. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा चुना लावून पळून जाणाऱ्या ची आरती या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करताहेत. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला रात्रंदिवस घाम गाळून मजबूत करणाऱ्या सर्वसामान्य माणसांना दोनशे रुपयांची गॅस कपात करून मोदींनी गोरगरिबांची क्रूर थट्टा केली असल्याचे बोलले जात आहे. या देशातील शेतकरी विशेषता महाराष्ट्रातील शेतकरी दररोज कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतोय. आणि या देशातील उद्योगपती कर्ज घेऊन पळून जातात. तरीही हे सरकार श्रीमंतांना उद्योग आणि व्यापारात सवलती देत असल्याचे दिसत आहे. उद्योगपती आणि या देशातील व्यापारी यांच्या हाताचं राजकारण हे बाहुलं बनलं आहे. त्यामुळे उद्योगपती बोले आणि पंतप्रधान झाले अशीच अवस्था सध्या राजकारणाची झालेली दिसते आहे. त्यामुळेच या उद्योगपतींना राजकीय आशीर्वाद 100% मिळतो. परंतु रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कष्टकरी आणि शेतकऱ्यांना मात्र या राजकारण्यांचा आशीर्वाद तर मिळत नाहीच उलट पक्षी या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात सापडल्यामुळे आपली जीवन यात्रा संपवावी लागते. उद्योगपतींना कोट्यावधी रुपयांची कर्ज देताना बँका कोणत्याही प्रकारचे नियम दाखवत नाहीत. परंतु शेतीप्रधान देश असलेल्या या देशातल्या शेतकऱ्याला आणि कष्ट करायला मात्र कर्ज देताना बँका विविध प्रकारचे नाना प्रश्न विचारून त्याचे कर्ज प्रकरण नाकारण्याचाच एक प्रकारे प्रयत्न करताना दिसत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. या देशातील गरिबांना अन्नधान्य मोफत देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. प्रत्येकाला घर मिळावे म्हणून घरकुल योजना राबविले जाते. परंतु या देशातील महागाई मात्र कमी करण्याचा प्रयत्न कोणत्या सरकारकडून आजपर्यंत झालेला दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य महागड्या घरासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यात आणि मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज भरण्यातच संपून जातं. ही संपूर्ण देशातील वस्तुस्थिती आहे. महागाईचा सगळा बोजा मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य माणसांच्या मस्तकी मारला जातो. त्यामुळे एखाद्या तरुणाचं संपूर्ण आयुष्य नोकरी शोधण्यात आणि उर्वरित आयुष्य कर्ज फेडण्यातच जात असल्याचं वास्तव आहे. महागाईचा सामना करण्यामध्ये मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे सरकारने सरसकट चारशे रुपयाची गॅस सिलेंडर मध्ये कपात केली असती तर या सर्वसामान्य नागरिकांनी सरकारला धन्यवाद दिले असते. परंतु केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गॅसचे दर कमी करून निवडणुका झाल्यानंतर हे सरकार हेच दर दुप्पट तर करणार नाही ना..! अशी
भीती सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment