मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस माढ्यासह परिसरात जोरदार बरसला... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस माढ्यासह परिसरात जोरदार बरसला...

 मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस माढ्यासह परिसरात जोरदार बरसला...


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरासह परिसरातील गावात रविवारी दुपारी  एक तास जोरदार  पाऊस झाला.रविवारी दुपारी  १२ वाजले नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.दुपारी अडीच वाजता मुसळधार पावसाने सुरूवात केली.मागील अनेक दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. उभी पिके जळुन चालली होती.पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता.माढा शहरात झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साठले होते तर रस्त्यावरील खड्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. रणदिवेवाडी,वडशिंगे,उंदरगाव,केवड,मानेगाव,धानोरे,कुर्डू भागासह अन्य भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. कापसेवाडी गावात देखील जोरदार पाऊस झाला.जोराचा आल्याने गावातील शेतकर्यानी नाचत आनंद साजरा केला. माढ्यातील प्रगतशील शेतकरी प्रमोद कदम यांच्या शेतातील २  एकर कांदा मुसळधार पावसाने वाहून गेला.प्रशासनाने नुकसानीचे  पंचनामे करुन  त्वरित नुकसान भरपाई देण्याची  मागणी करण्यात आली आहे.ऑक्टोबर.सायंकाळी ६.३० वाजले नंतरही जोरदार पाऊस झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages