माढा मराठा समाज रास्ता रोको आंदोलन
माढ्यात मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन,मराठा समाजातील लहान
मुलांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन
माढा (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजावर जालना जिल्हात झालेल्या लाठीमारीच्या घटनेच्या निषेधार्थ माढ्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज बांधवानी एकत्रित येऊन आंदोलनास सुरुवात केली.वाहने थाबंवुन चक्का जाम केला.यावेळी मराठा समाजातील आंदोलकांनी घोषणाबाजी करुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.मराठा समाजातील लहान शालेय मुलांच्या हस्ते तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी मराठा समाज बांधवांनी मनोगतातून शिंदे फडणवीस पवार सरकारच्या कार्य पद्धतीचा जोरदार टीकास्त्र करुन खरपूस समाचार घेतला.सकाळी १० वाजता सुरु झालेले रास्ता रोको आंदोलन एक तास सुरु होते.माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना शालेय विद्यार्थ्यानी लेखी निवेदन दिले.यावेळी मराठा आंदोलकाकडुन एक मराठा लाख मराठा...जय जिजाऊ ..जय शिवराय अश्या घोषणा देऊन मराठा आरक्षण देण्याची मागञी करण्यात आली.शहरासह परिसरातील गावातील मराठा समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.माढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

No comments:
Post a Comment