यापुढे तलवार मोर्चे काढा मी नेतृत्व करण्यास तयार आहे- संजय पाटील-भिमानगरकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

यापुढे तलवार मोर्चे काढा मी नेतृत्व करण्यास तयार आहे- संजय पाटील-भिमानगरकर

 यापुढे तलवार मोर्चे काढा मी नेतृत्व करण्यास तयार आहे- संजय पाटील-भिमानगरकर


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- आता मुकमोर्चा नको ठोक मोर्चे काढले पाहिजेत.आरक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात तलवारी घेऊन जेलभरो आंदोलन करा मी आंदोलनाचे नेतृत्व करण्यास तयार आहे.तसेच मराठा आरक्षण आंदोलनास जो आडवा येईल त्यास बदडून काढले पाहिजे असे प्रतिपादन संजय पाटील-भिमानगरकर यांनी केले.

टेंभुर्णी येथील करमाळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकल मराठा संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी दहा वाजता पुष्पहार घालून आंदोलनास सुरुवात केली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील शांततेत उपोषण आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जमलेल्या निषेध मोर्च्यास संबोधित करताना संजय पाटील-भिमानगरकर बोलत होते.रविवारी टेंभुर्णीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

पुढे बोलताना ते म्हणाले की,मराठा आरक्षणाच्या विरोधात कोण रिट पिटीशन दाखल करेल त्याच्या गाड्या जाळल्या पाहिजेत.त्यास बदडून काढा. तुकाराम ढवळे म्हणाले की,आपली भूमिका मांडण्यासाठी मराठा आमदार ठोस भूमिका घेत नाहीत.मारहणीचे आदेश दिले नाहीत तर मग पोलिसांवर गुन्हे का दाखल करीत नाही असा प्रश्न उपस्थित केला.देश हुकूमशाहीकडे चालला आहे.आता मराठे कोंडीत सापडले आहेत.उद्या सर्व बहुजन समाज याच चक्रात सापडेल.नागपूरचा गणपती आपल्याच माणसाला पुढे करून अडचणी वाढवत आहे.एकनाथ शिंदे,अजित पवार यांनी राजीनामे दिले पाहिजेत असे ही ढवळे म्हणाले.

यावेळी सचिन जगताप,राहुल चव्हाण, सुरज देशमुख,प्रमोद कुटे,भाऊ महाडिक,अजित पाटील,सचिन पवार, रामभाऊ शिंदे,संभाजी पाटील,प्रशांत पाटील,शिवाजी इंदुलकर,विठ्ठल मस्के,जयवंत पोळ,सुरेश लोंढे,परमेश्वर खरात,ॲड तुकाराम राऊत,विशाल नवगिरे,महेंद्र वाकसे, प्रा.दीपक पाटील,दादासाहेब पिसाळ सर यांच्यासह अनेकांची जोशपूर्ण भाषणे झाली.

शेवटी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील व टेंभुर्णीचे मंडळ अधिकारी सुनील शेळवणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगर कर मार्केट कमिटीचे सदस्य तुकाराम बंडू नाना ढवळे पाटील जि प सदस्य प्रतिनिधी भाई शिवाजी पाटील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप टेंभुर्णीतील तिसऱ्या आघाडीचे उमलते नेतृत्व सुरज भैय्या देशमुख टेंभुर्णी सरपंच प्रमोद कुटे , तांबवे टें चे तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ खटके , प्रहार संघटनेचे अमूल जगदाळे, यशोदीप ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके सर, टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सदस्य भाऊसाहेब महाडिक- देशमुख , जाणता राजा मित्र मंडळाचे वैभव भैय्या महाडिक- देशमुख, टेंभुर्णी चे माजी सरपंच  परमेश्वर खरात, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पोळ, शेतकरी संघटनेचे विठ्ठल मस्के, शिवसेनेचे टेंभुर्णी शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे ,विलास देशमुख , मार्केट कमिटीचे सदस्य नागेश खटके, धनंजय मोरे, दिलीपराव भोसले, रामभाऊ शिंदे संभाजी पाटील, रमेश पाटील भिमानगर कर, प्रशांत पाटील ,महेंद्र वाकसे, अँड तुकाराम राऊत ,संतोष कानडे, मंगेश देशमुख ,बाळासाहेब देशमुख ,कांतीलाल देशमुख , सामाजिक कार्यकर्ते विजय खटके ,सचिन पवार ,गणेश व्यवहारे ,प्रतापराव काळे गुरुजी, आरपीआयचे टेंभुर्णी शहराध्यक्ष रमेश लोंढे मार्शल, शिवसेनेचे अमोल धुमाळ , टेंभुर्णी युवासेनेचे शहराध्यक्ष किशोर देशमुख, राष्ट्रवादी युवकचे माढा तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे, आप संघटनेचे गगन गोडसे सर, अरबाज तांबोळी, अकोले चे दीपक पाटील सर,भाई अजित पाटील वरवडे ,राजकुमार कोठारी , बहुजन वंचित आघाडीचे विशाल नवगिरे, महेंद्र लोंढे , मराठा सेवा संघाचे विलास कोठावळे, सचिन खुळे राहुल टिपाले , शिवसेनेचे प्रशांत सोनवणे , बाळासाहेब कदम,सोमनाथ आप्पा महाडिक,  श्रीकांत लोंढे, रमेश पाटील सुरलेकर ,भारत गायकवाड पपेश पाटील ,विकास मस्के ,चेअरमन पोपट मामा चव्हाण घोटीकर, चव्हाणवाडी चे माजी सरपंच हनुमंत चव्हाण, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सटाले, यशपाल लोंढे, माळेगावचे आप्पा पाटील, भजनदास खटके, सौदागर भोसले, बाळासाहेब जगताप, अनिल भोसले, संजय देशमुख, यावेळी सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले. तर आभार गोरख देशमुख यांनी मानले यावेळी शेकडो तरुण एकवटले होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडूनये यासाठी 
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील, Psi ओमासे, एएसआय गोळे, पोलीस हवालदार गाडे,  मारकड, परवते, शिंदे, नलवडे, गिरमकर, साठे, पोलीस कॉन्स्टेबल काटे,लवळे, मुलाणी, घाडगे, पवार, जगदाळे, खराडे, यांनी यावेळी बंदोबस्त चोख ठेवला होता टेंभुर्णी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी तसेच विविध संघटनांनी आजच्या सकल मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन आज दिवसभर अति आवश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला होता कुठेही आजच्या बंदला गालबोट लागू नये म्हणून टेंभुर्णी शहरात प्रत्येक चौकात पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages