बाळराजे पाटील यांच्या प्रतिमेचे आणि नावाचे टॅटू काढत आगळीवेगळी पक्षनिष्ठा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

बाळराजे पाटील यांच्या प्रतिमेचे आणि नावाचे टॅटू काढत आगळीवेगळी पक्षनिष्ठा

 बाळराजे पाटील यांच्या प्रतिमेचे आणि नावाचे टॅटू काढत आगळीवेगळी

 पक्षनिष्ठा

बाळराजे पाटील यांनी व्यक्त केली भावनिक कृतज्ञता



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- हल्लीच्या राजकारणामध्ये निष्ठावंत समर्थक आणि प्रामाणिक कार्यकर्ते मिळणे ही जरी दुरापास्त गोष्ट झाली असली तरी अनगर येथील दोघा युवकांनी आणि हिवरे येथील एका युवकाने आपल्या हातावर राष्ट्रवादीचे युवा नेते बाळराजे पाटील यांच्या फोटो आणि नावाचे टॅटू काढून आगळ्यावेगळ्या निष्ठेची प्रचिती संपूर्ण जिल्ह्याला करून दिली आहे. अनगर येथील रणजित गुंड आणि अभिजित जाधव यांनी हातावर बाळराजे यांच्या प्रतिमेचे तर हिवरे येथील आकाश मोरे यांनी बाळराजे नावाचे टॅटू साकारून निस्सीम आपुलकी आणि प्रेमळ जिव्हाळ्याचे दर्शन घडवले आहे.

जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा  युवा बाळराजे पाटील हे लोकनेते कारखान्याचे चेअरमन आहेत. शिवाय माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ मतदारसंघाच्या विकासाची धुरा आमदार यशवंत माने यांच्या सोबत राहुन ते पाहत आहेत. बाळराजे पाटील आणि त्यांचे बंधू अजिंक्यराणा पाटील यांची युवा वर्गात गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने मोठी क्रेझ आहे. निवडणूक कोणतीही असली तरी बाळराजे पाटील हे आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये युवकांची मोठी फळी सोबत असल्यामुळे स्टार प्रचारक ठरले आहेत. बाळराजे पाटील यांच्यासोबत सक्रिय असणारे अनेक कार्यकर्ते आज मोठमोठ्या पदावर राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामध्ये जि प सदस्य पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर विविध ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पक्षातील महत्त्वाच्या पदावर त्यांचे समर्थकांची वर्णी लागली आहे. मोहोळ मतदारसंघातच नाही तर पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये देखील त्यांना मानणारा मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे बाळराजे पाटील यांच्या फोटोचा आणि नावाचा टॅटू काढणाऱ्या या तीन युवकांची संपूर्ण मतदारसंघात मोठी चर्चा होत आहे.


निरपेक्ष आणि निस्वार्थी भावनेचे निष्ठावंत समर्थक हेच अनगरकर-पाटील परिवाराचे सामर्थ्यशाली वैभव ठरले आहे. अनगर येथील रणजित गुंड आणि अभिजित जाधव यांनी हातावर माझ्या प्रतिमेचे तर हिवरे येथील आकाश मोरे यांनी माझ्या बाळराजे नावाचे टॅटू साकारून निस्सीम आपुलकी आणि प्रेमळ जिव्हाळ्याचे दर्शन घडवले आहे. खरंच या सच्चा कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून मी निशब्द झालो. या तिघा कार्यकर्त्यांच्या अलोट प्रेमाचा मी अंत:करणापासून स्वीकार करतो आणि आमच्यातील आपुलकीचा स्नेहबंध असाच भक्कम राहील अशी ग्वाही देतो.
बाळराजे पाटील 
चेअरमन लोकनेते शुगर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages