माढा तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे हालगीनाद -घंटानाद आंदोलन
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रश्नी हालगीनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सततच्या पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने आंदोलन केले.छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन हालगीनाद करीत माढा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
त्यानंतर माढा तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह सिद्धेश्वर घुगे, सत्यवान गायकवाड,महाविर सावळे आदींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या व सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलनाला सुरुवात केली.यावेळी स्वाभिमानी च्या कार्यकत्याॅनी घंटानाद आंदोलन केले.तहसीलदार विनोद रणवरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या वर्षी खरीप हंगाम २०२२ मध्ये सततच्या पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.टाकळी(टे) गावच्या कोतवालाची वर्क ऑर्डर रद्द करण्यात यावी.रिधोरे व म्हैसगाव ला स्वतंत्र गावकामगार तलाठी देण्यात यावा यासह अन्य मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

No comments:
Post a Comment