नक्षत्र कराओके सिंगिंग अँकॅडमी तर्फे 10 सप्टेंबर रोजी गायन स्पर्धा आणि 17 सप्टेंबर रोजी तेरे सूर मेरे गीत ....! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

नक्षत्र कराओके सिंगिंग अँकॅडमी तर्फे 10 सप्टेंबर रोजी गायन स्पर्धा आणि 17 सप्टेंबर रोजी तेरे सूर मेरे गीत ....!

 नक्षत्र कराओके सिंगिंग अँकॅडमी तर्फे 10 सप्टेंबर रोजी गायन स्पर्धा आणि

 17 सप्टेंबर रोजी तेरे सूर मेरे गीत ....!

प्रा.अनिल लोंढे यांची माहिती....!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारताची गान कोकिळा भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या 93 व्या जयंतीचे औचित्य साधून नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमी च्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेचे स्वर्गीय पद्माकर देव नाट्य सभागृह मोदीखाना येथे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी लतादीदींनी गायलेल्या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा.  अनिल लोंढे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रा.  अनिल लोंढे म्हणाले, " लतादीदीने व इतर गायक/ गायिकेने गायलेल्या सोलो व ड्युएट गीतांची कराओके गायन स्पर्धा दिनांक १० सप्टेंबर रोजी डॉक्टर भास्कर पाटील हॉस्पिटल समोर पद्माकर देव नाट्य सभागृहामध्ये मोदीखाना येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा सकाळी 10 वाजता घेण्यात येणार असून ही स्पर्धा दोन गटात होत असून लहान गट 8 ते 17, आणि खुल्या गटामध्ये 18 वर्षाच्या पुढील विजयी स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. लहान गटामध्ये प्रथम क्रमांक फटकाविणाऱ्यास दोन हजार रुपये रोख,  द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यास एक हजार रुपये रोख  आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पाचशे रुपये रोख असे पारितोषिक असून खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास तीन हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यास दोन हजार रुपये रोख  आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या एक हजार रुपये रोख असे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर याच स्पर्धेतील विजयी प्रथम क्रमांकाच्या दोन स्पर्धकांना दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी शिवस्मारक सभागृह येथे होणाऱ्या तेरे सूर मेरे गीत या भव्य कार्यक्रमात गायन करण्याची संधी सुद्धा देण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना या गायनाच्या निमित्ताने फार मोठी मेजवानीच  मिळाले असल्याचं या कार्यक्रमामधून दिसून आलं आहे. तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन नक्षत्रा अकॅडमीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2023 असून प्रवेश फी दोनशे रुपये इतकी आहे. आपण आपली प्रवेश फी गुगल पे,  फोन पे,  अथवा रोख स्वरूपात  जमा करावेत.  श्रीमती सुनंदा शेंडगे मोबाईल: -9850841210 , अभिलाषा बंडेगिरी मोबाईल: -9960427881 , डॉ.  मुकुंद लिमये मोबाईल 98 34 78 71 58, आणि कृष्णा हनगल मोबाईल: -9860151530  यांच्या कशी संपर्क साधून आपण आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती सुनंदा शेंडगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages