आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन संघाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन संघाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव..!

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन संघाच्या वतीने श्रीकृष्ण

 जन्माष्टमी महामहोत्सव..!

6 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी महा महोत्सव होणार असल्याची व्यंकटेश

 नंदाल यांची माहिती...!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन संघ सोलापूर यांच्या वतीने, बुधवार दिनांक 6 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी महा महोत्सव वच्रधाम श्री श्री राधा दामोदर मंदिर जकात नाक्याच्या पाठीमागे अक्कलकोट रोड येथे होणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष श्रीमान कृष्ण भक्त प्रभू आणि व्यंकटेश नंदाल यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना श्रीमान कृष्ण भक्त प्रभू म्हणाले की, " ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारागृहात प्रकट झाले त्यावेळी संपूर्ण कारागृह प्रकाशीत झाला. आणि अंधकार नष्ट झाला त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण जेव्हा या पृथ्वीतलावर तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रकट होतात त्यावेळी अज्ञानरूपी अंधकार नष्ट होऊन आपल्या जीवनात दिव्य ज्ञान आणि आनंद प्रदान करतात.  अशी माहिती यावेळी  कृष्ण भक्त प्रभू यांनी दिली. श्रीकृष्ण जन्म अष्टमीच्या निमित्ताने आमच्या इस्कॉन संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा येईल दोन दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता लक्ष तुळशी अर्चनाने जन्माष्टमी कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. सायंकाळी पाच ते दहा या वेळेत भजन,  कीर्तन,  कृष्ण कथा, आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होणार असून त्यामध्ये नाट्यलीला नृत्य श्लोक पठण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता काकडा आरती पासून कार्यक्रमास प्रारंभ होणार असून  सकाळी आठ वाजता विष्णू सुदर्शन  महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये सर्व यजमानांच्या द्वारे श्री श्री राधाकृष्णांचा कलश महा अभिषेक हा उत्सव होणार आहे पद नंतर कृष्ण कथा आणि रात्री ठीक बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव, महाआरती आणि भगवंतांना 56 भोग अर्पण करण्यात येतील. त्यानंतर शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य अभय चरणा रविंद, भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांची 127 वी जयंती म्हणजेच व्यासपूजा महोत्सव सुद्धा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता अभिषेक ,शब्दांजली,  पुष्पांजली आणि दुपारी साडेबारा वाजता महाआरती असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने मंदिरात संपूर्ण दिवस  हरिनाम संकीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे. भगवंतांचे विशेष शृंगार दर्शन,  भगवंताचा पाळणा, अध्यात्मिक प्रश्न उत्तरे,  गोविंद महाप्रसाद,  अध्यात्मिक ग्रंथ भांडार,  पूजेचे साहित्य आणि प्रसाद असे आध्यात्मिक आकर्षण असणार आहे. मंदिराच्या वतीने संपूर्ण सोलापुरातील नागरिकांना या जन्माष्टमी महोत्सव सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान कृष्ण भक्त प्रभू यांनी आमंत्रित केलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत इस्कॉन संघाच्यावतीने करण्यात आलेलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages