प्रत्येक रक्तदान करणा-या व्यक्तीचा दृष्टीकोन उदात्त आणि हेतू विधायक असतो - प्राचार्य सुभाष नागटिळक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

प्रत्येक रक्तदान करणा-या व्यक्तीचा दृष्टीकोन उदात्त आणि हेतू विधायक असतो - प्राचार्य सुभाष नागटिळक

 प्रत्येक रक्तदान करणा-या व्यक्तीचा दृष्टीकोन उदात्त आणि हेतू

 विधायक असतो - प्राचार्य सुभाष नागटिळक


माढा (कटूसत्य वृत्त):- आजच्या समाजात अनेकजण पैशाच्या पाठीमागे धावत आहेत त्यामुळे आधी स्वार्थ मग परमार्थ अशी भूमिका घेतात परंतु रक्तदात्यांचे तसे नसते.रक्तदाते उदात्त दृष्टीकोन व विधायक हेतू डोळ्यासमोर ठेवून मोठ्या मनाने आणि धाडसाने रक्तदान करून समाजातील गोरगरीब व गरजूंना मदत करण्याची भूमिका घेतात ही बाब निश्चितच कौतुकास्पद व अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन कुंभेजचे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष नागटिळक यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आमदार बबनदादा शिंदे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी बोलत होते.

पुढे बोलताना प्राचार्य सुभाष नागटिळक यांनी सांगितले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते एक पवित्र कार्य आहे त्यामुळे रक्तदान करणा-यांना मानसिक व आत्मिक समाधान लाभते.आमदार बबनदादा शिंदे यांनी मतदारसंघात गावोगावी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे रक्तदान शिबिरांना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी विठ्ठलवाडी,कुंभेज व खैरेवाडी या तीन गावांचे एकत्रितपणे 76 जणांनी रक्तदान केले.रक्त संकलनाचे काम सोलापूरच्या सिद्धेश्वर ब्लड बँकेने केले.

यावेळी विठ्ठलवाडीच्या सरपंच संगीता अनभुले,एलआयसीचे सेवानिवृत्त उपशाखा प्रमुख मोहन कदम, चेअरमन अनिलकुमार अनभुले, खैरेवाडीचे सरपंच बाळासाहेब इंगळे,कुंभेजचे उपसरपंच मदन आलदर,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,माजी सरपंच बालाजी गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे,प्रा.अरुण कदम, मुख्याध्यापक विठ्ठल नागटिळक, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,सौदागर गव्हाणे,धनाजी सस्ते, सचिव नेताजी उबाळे,सतीश गुंड,कैलास सस्ते,रमेश जाधव,रामलिंग बाबर,मारूती शेंडगे, अशोक गव्हाणे,अनिसा पठाण, भिमराव शिंगाडे,सुनील शेंडगे,मोहन शिंगाडे,लक्ष्मण लावंड,रामदास कोकाटे,दत्तात्रय खैरे,वैभव पाटील, आण्णासाहेब वाघमोडे,शिवाजी शेगर,समाधान कोकाटे,गोरखनाथ शेगर,बालाजी पाटील,विशाल अनभुले,ज्ञानेश्वर शेंडगे,प्रकाश खैरे,गहिणीनाथ जगताप,शिवाजी जाधव,ज्ञानेश्वर तरंगे,अशोक कदम सुरेश शेगर, सोमनाथ कदम,संतोष शिंगाडे यांच्यासह ग्रामस्थ, युवक व ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages