मराठा समाजाच्या आंदोलकावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ अंजनगाव
उमाटे येथे तीव्र आंदोलन
एक मराठा लाख मराठासह विविध घोषणांनी दुमदुमून गेला परिसर
माढा (कटूसत्य वृत्त):- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणा-या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानूषपणे केलेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथील सकल मराठा बांधवांसह इतर समाजाच्या वतीने जामगाव ते बार्शी या मुख्य रस्त्यावर टायर पेटवून सरकारच्या अन्यायकारक भूमिकेच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला गावातील दुकानदार व व्यवसायिकांनी कडकडीत बंद ठेवून तीव्र निषेध नोंदविला.यावेळी सरकार विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा,मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणा-या नाकर्त्या सरकारचा निषेध,आरक्षण आमच्या हक्काचे ते आम्हाला मिळालेच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर आम्हाला गृहीत धरू नका, मराठा समाजावर आजपर्यंतच्या सर्वच शासनकर्त्यांनी अन्याय केला आहे फक्त मतांसाठी वापर केला आहे त्यामुळे यापुढे जे आपल्या समाजाचा प्रश्न त्वरित मार्गी लावतील त्यांनाच सहकार्य करावे, लवकर प्रश्न मार्गी लावला नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याऐवजी शासनकर्ते मराठा समाजाच्या बांधवांवर पोलिसामार्फत लाठीचार्ज करीत आहेत.मागणी दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत शासनाची ही भूमिका हुकूमशाही प्रवृत्तीची आहे.जर केंद्र व राज्य सरकारने आमच्या रास्त मागणीचा तातडीने विचार करून जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर भविष्यकाळात त्याचे गंभीर परिणाम राज्यकर्त्यांना नक्कीच भोगावे लागतील असा इशारा सकल मराठा समाजाच्या बांधवांनी दिला आहे.यावेळी इतर समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पाठिंबा दिला.
.png)
No comments:
Post a Comment