मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मानेगावात आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मानेगावात आंदोलन

 मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मानेगावात

 आंदोलन

दुकानदार व व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळून नोंदविला निषेध


माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील मानेगाव येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने मोहोळ ते बार्शी या मुख्य रस्त्यावर टायर पेटवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आंदोलनाला गावातील अत्यावश्यक सेवा वगळता दुकानदार व व्यवसायिकांनी कडकडीत बंद ठेवून शासनाच्या अन्यायकारक भूमिकेचा तीव्र निषेध नोंदविला.

अनेक वर्षापासूनची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे.मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याऐवजी शासनकर्ते सनदशीर मार्गाने मागणी करणा-या सकल मराठा समाजाच्या बांधवांवर पोलिसामार्फत लाठीचार्ज करीत आहेत.मागणी दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत शासनाची ही भूमिका खूपच अन्यायकारक व हुकूमशाही प्रवृत्तीची असल्याचे म्हणणे आंदोलनकर्त्यांचे आहे.जर केंद्र व राज्य सरकारने आमच्या रास्त मागणीचा तातडीने विचार करून जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर भविष्यकाळात त्याचे गंभीर परिणाम राज्यकर्त्यांना नक्कीच भोगावे लागतील असा इशारा सकल मराठा समाजाच्या बांधवांनी दिला आहे.सध्या आम्ही लोकशाहीचा आदर करून सनदशीर मार्गाने आमची मागणी शासनाकडे करीत आहोत.अनेक मराठा समाजातील बांधवांनी आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले आहे तरीसुद्धा चालढकल व दप्तर दिरंगाई करणा-या शासनकर्त्यांना जाग आली नाही.जर मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर भविष्यकाळात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली जाणार आहे व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे सकल मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages