गृहमंत्र्यांच्या आदेशानेच जालना येथे मराठा समाज बांधवांवर लाठी चार्ज
करण्यात आल्यामुळे या घटनेचा दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या वतीने जाहीर
निषेध ..!
दक्षिण मतदारसंघ सरकारला जागा दाखवणार..!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण तालुक्याचे भटक्या विमुक्त काँग्रेस संघटनेचे सचिव सोमण्णा पुजारी यांचे मत..!!! - लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशानेच केला असून राज्यातील मराठा समाज आणि धनगर समाज बांधव आता सरकारला जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं यावेळी बोलताना पुजारी यांनी सांगितलं. पुढे बोलताना पुजारी म्हणाले की, महा विकास आघाडी आरक्षण मिळेपर्यंत या समाजाच्या पाठीशी उभा राहिला आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या रणांगणात भाजपचे पानिपत होऊन 48 पैकी 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास सुद्धा यावेळी पुजारी यांनी व्यक्त केला आहे.त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी 288 पैकी 200 हून अधिक जागा जिंकेल आणि खोटे बोलून मत मिळवणाऱ्या फसव्या भाजप सरकारला कात्रज चा घाट दाखवेल असे त्यांनी सांगितलं.तसेच सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी आठ जागा महाविकास आघाडी 2024 च्या रणांगणावर जिंकेल असाही विश्वास यावेळी पुजारी यांनी व्यक्त केला असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी लढवावी आणि त्यांनाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी द्यावी. आणि दक्षिण तालुक्यातून महाविकास आघाडीमध्ये माजी आमदार दिलीप माने यांना समाविष्ट करून त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्याची उमेदवारी काँग्रेस कमिटीने द्यावी अशी मागणी सुद्धा भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हा सचिव सोमण्णा पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
याप्रसंगी बेळेन सिद्ध जकाते, गजानंद कोळी, शाम नरुटे आधी सहकार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment