इंडिया आघाडीला घालायची वेसन..! म्हणूनच मोदींनी बोलावलं अचानक अधिवेशन...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

इंडिया आघाडीला घालायची वेसन..! म्हणूनच मोदींनी बोलावलं अचानक अधिवेशन...!

 इंडिया आघाडीला घालायची वेसन..!

म्हणूनच मोदींनी बोलावलं अचानक अधिवेशन...!



सोलापूर (दादासाहेब निळ):- आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून तब्बल 28 पक्ष एकत्रपणे  मुंबई येथे एकवटले. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये इंडिया आघाडीची रणनीती आखली जात असताना अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन जाहीर करून नवीन गुगली टाकली आहे.
या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक राष्ट्र एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन यासाठी डावपेच आखून ठेवले आहेत. त्यात भर म्हणजे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिनांक 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे पाच दिवसाचे विशेष अधिवेशन जाहीर करून टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयाला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय अचानकपणे का घेतला असावा..? असा प्रश्न सध्या विरोधी पक्षासह 143 कोटी भारतीय नागरिकातून विचारला जातोय.
या अतिशय घिसाडघाईत घेतलेल्या निर्णयाचा इंडिया आघाडीतील 28 विरोधी पक्ष आणि देशभरातील तमाम नागरिकांना 440 व्होल्टेज चा शॉक बसलाय. मुंबई या ठिकाणी नुकतीच इंडिया आघाडी ची अतिशय बहारदार वातावरणामध्ये बैठक झाली. 28 पक्षाची इंडिया आघाडीची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी तसेच आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव,  ममता बॅनर्जी आधी सह सर्व मातब्बर नेते प्रयत्नशील आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे नाव सध्या सर्वत्र देशभर चर्चेत असून त्यांना प्रियंका गांधी यांची मोठ्या प्रमाणात साथ मिळू लागल्यामुळेच कर्नाटकात विजयी सोपा झाला. आता त्याची पुनरावृत्ती पुन्हा लोकसभेत होऊ नये यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीचं लक्ष विचलित करण्यासाठी गरज नसताना विशेष अधिवेशन बोलावलं असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशन काळामध्ये गणेश उत्सवाचा माहोल संपूर्ण देशभर होणार आहे. या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या विधेयकावर चर्चा होणार..? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वगळता देशातील एकही नेत्याला सांगता येत नाही हे विशेष..! केंद्रीय मंत्री,  विरोधी पक्ष,  रणनीती कार किंवा  प्रसार माध्यमांना सुद्धा कोणत्याही प्रकारची खबरबात अद्याप पर्यंत कोणाच्याही कानाला लागली नसल्यामुळे फार मोठी गुप्तता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवल्यामुळे या अधिवेशनाचे गुपित काय..? याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. जेव्हा सरकार अशा पद्धतीने अचानकपणे एखादा निर्णय जाहीर करतो तेव्हा विरोधी पक्षच काय तर सर्व देशभरातील नागरिकांच्या मनामध्ये फार मोठं विचारांचा वादळ उठल्याशिवाय राहत नाही. नोटबंदी,  सर्जिकल स्ट्राइक याच धर्तीवर आता अकस्मात पणे जाहीर झालेलं विशेष अधिवेशन याची भर पडलेली आहे. सध्या वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा देशभरामध्ये सर्व विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असतानाच प्रधानमंत्री यांनी अचानकपणे विशेष अधिवेशन बोलवल्यामुळे त्यामध्ये शंभर टक्के हीच चर्चा होणार ..!अशा प्रकारचे मनसुबे सुद्धा आखले जात आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकी व्यतिरिक्त पुढील वर्षी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडीसा, सिक्कीम, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये ही निवडणूक होणार असल्या कारणाने विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा असल्याचं सुद्धा बोलले जात आहे. लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत असल्यामुळे समान नागरी कायदा किंवा वन नेशन वन इलेक्शनचा कायदा पारित करण्यासाठी सरकारला कोणतीही अडचण नाही परंतु तरीसुद्धा हे अधिवेशन घेण्यामागचं  गुढ मात्र कोणाचेही लक्षात आलेले नाही. निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि विरोधकांना खिंडीत पकडण्यासाठी मोदी सरकार सध्या अनेक योजना तयार करत असून 2024 चा आखाडा जिंकण्यासाठीच सध्या गरज नसताना विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोठा गाजावाजा करत  घाईघाईत अधिवेशन बोलावल्यामुळे याची सध्या सर्व देशभर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages