आ. बबनदादांच्या वाढदिवसा निमित्त राहुल काका पुरवत यांच्या तर्फे एकलव्य अभ्यासिकेस २५००० रुपयाची देणगी....! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

आ. बबनदादांच्या वाढदिवसा निमित्त राहुल काका पुरवत यांच्या तर्फे एकलव्य अभ्यासिकेस २५००० रुपयाची देणगी....!

 आ. बबनदादांच्या वाढदिवसा निमित्त राहुल काका पुरवत यांच्या तर्फे

 एकलव्य अभ्यासिकेस २५००० रुपयाची देणगी....!

 ६२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून केला वाढदिवस साजरा....!!



करकंब (कटूसत्य वृत्त):- करकंब येथे  आमदार बबनदादा शिंदे यांच्या ७२व्या  वाढदिवसानिमित्त राहुल काका पुरवत यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करकंब येथे भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सकाळ पासूनच करकंब व‌ करकंब पंचक्रोशीतील रक्तदात्यांची रक्तदान करण्यासाठी गर्दी झाली होती. ती अगदी सायंकाळी ५ वाजेपर्यत रक्तदात्यांचा ओघ सुरुच होता.यावेळी विक्रमी ६२५ रक्तदात्यांनी रक्तदान करत आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला.यावेळी बबनदादा यांचं आगमन झालेनंतर राहुल काका पुरवत यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आमदार बबनदादा यांचा जंगी सत्कार राहुलकाकांच्या शुभहस्ते करण्यात आला,यावेळी सांगताना बबनदादांनी सांगितले की जनतेची  सेवा हेच काम सतत केल्याने जनतेनं भरपूर प्रेम दिलं,माढा येथेही १कोटी रुपये खर्चून अद्यावत नेत्रालयाचा शुभारंभ झाला, त्यालाही राहुलकाकांनी १५५५५५/-रुपये दिले,सर्वांचे आभार मानले,यावेळी बाळासाहेब देशमुख,मा.जि.प.सदस्या रजनीताई देशमुख,रघूनाथ जाधव,यांनी मनोगते सादर करत आमदार बबनदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सारिका ताई पुरवत,बापू शिंदे, नागनाथ गायकवाड,बापू शिंगटे, संतोष धोत्रे,मुस्तफा बागवान, बाळासाहेब हराळे, नंदकुमार व्यवहारे, महेश बोचरे,संतोष पिंपळे, मिलिंद उकरंडे, पांडुरंग व्यवहारे,भिमा व्यवहारे, ऋषिकेश वाघमारे, पत्रकार लक्ष्मण शिंदे, सुनिता पवार, औदुंबर कुंभार,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी करकंब येथे नव्यानेच निर्माण झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एकलव्य अभ्यासिकेला राहुल काका पुरवत यांच्या वतीने २५०००/-देणगीचा चेक बबनदादांच्या शुभहस्ते एकलव्य पदाधिकाऱ्यांना सुपूर्त केला. यावेळी राहुलकाका मित्र परिवार वरुन पुरवत,अक्षय नगरकर महेंद्र पवार,गुळमे सर, प्रथमेश नगरकर,मनोज पवार, संतोष टकले,गणेश दुधाने, वाजीत तांबोळी,सूरज व्यवहारे,दत्ता शिंगटे मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत रक्तदान शिबीर यशस्वी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages