उर्दू साहित्य समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांना पुरस्कार..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ऍड . यु .एन . बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना बेरिया म्हणाले, " दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कॉम्रेड बेरिया शैक्षणिक संकुल नवीन हॉल लष्कर येथे डॉक्टर फही मोद्दीन पी रजादा अध्यक्ष अंजुमन तरकीय उर्दू गुलबर्गा यांच्या शुभहस्ते होणार असून प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी कुदसिया शेख यांची उपस्थिती लाभणार आहे. उर्दू भाषेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी घेतलेले परिश्रम राबविलेली विविध उपक्रम तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र ,भेटवस्तू ,शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलताना बेरिया यांनी सांगितलं. पुरस्काराचे आठ वर्ष असून यंदाच्या वर्षी एकूण 42 जणांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करणार असून त्यामध्ये प्राथमिक शाळेतील सहा माध्यमिक शाळेतील दोन शिक्षक व चार मुख्याध्यापक उच्च माध्यमिक विभागातील एक व क्रीडा विभागातील एक अशा शिक्षकांचा समावेश आहे. या पत्रकार परिषदेला नशीर आळंदकर आयुब नल्लामंदू, रफिक खान ,शफिक कॅप्टन आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment