सोलापूर शहर डिजिटल मुक्त व डॉल्बीमुक्त करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

सोलापूर शहर डिजिटल मुक्त व डॉल्बीमुक्त करा

 सोलापूर शहर डिजिटल मुक्त व डॉल्बीमुक्त करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा त्या आदेशाचे उल्लंघन करून सोलापूर शहरांमध्ये राजरोसपणे अनधिकृत डिजिटल बॅनर व मोठी मोठी झाडे तोडून अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात लागलेली दिसून येत आहे याबाबत पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे प्रमाण वरचेवर वाढत आहे त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान संबंधित प्रशासनाकडून होत आहे त्यामुळे तात्काळ उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासनास द्यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली
 सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वेगवेगळ्या जयंती व कार्यक्रमानिमित्त मोठ मोठ्या आवाजाचे डॉल्बी सिस्टीम लावण्यात येतात त्यामुळे अनेक हृदयविकार असलेल्या रुग्णांना याचा त्रास होत असून हॉस्पिटलमधील अनेक रुग्णांना व नागरिकांना याचा फटका बसत आहे. जाणून बुजून प्रशासनाच्या वतीने या गोष्टीकडे डोळे झाक करण्यात येत आहे त्यामुळे अशा डॉल्बीवर बंदी घालण्यात यावी व कोणालाही डॉल्बी लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये सोलापूर शहरात डिजिटल बॅनर चे फुटले आहे अशा लोकांवर  कारवाई करण्यात येऊन डिजिटल मुक्त व डॉल्बीमुक्त सोलापूर शहर होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरांमध्ये प्रत्येक चौकाचौकात अनधिकृत डिजिटल बॅनर चे थैमान मांडले असून त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना या अनधिकृत डिजिटल बॅनरच्या त्रास होत असून त्याचा व्यापारावर परिणाम होत आहे त्यामुळे सोलापूर शहरातील सर्वच ठिकाणी लागलेले अनधिकृत डिजिटल बोर्ड तात्काळ काढण्यात यावेत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर शहरांमध्ये डिजिटल बॅनर व डॉल्बी लावण्यास कायमस्वरूपी बंदी आणावी अन्यथा उच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान होत असल्याने संभाजी ब्रिगेड च्या वतीने प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपचार प्रमुख सिताराम बाबर, शहर सचिव रमेश चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, जिल्हा संघटक बबन डिंगणे, जिल्हा सचिव राजेंद्र माने, दत्तात्रय लामकाने, ओंकार कदम, अक्षय चौगुले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages