चिंचोली गाव १०० टक्के बंद,चक्का जाम आंदोलन करुन जालना घटनेचा नोंदवला निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

चिंचोली गाव १०० टक्के बंद,चक्का जाम आंदोलन करुन जालना घटनेचा नोंदवला निषेध

 चिंचोली गाव १०० टक्के बंद,चक्का जाम आंदोलन करुन जालना घटनेचा नोंदवला निषेध 


माढा (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणाच्या मागणी प्रश्नी मराठा समाजातील आंदोलकावर जालना जिल्हात झालेल्या लाठीमारीच्या हल्याच्या निषेधार्थ  माढा तालुक्यातील चिंचोली गावात बंद पाळण्यात आला.

गावचे सरपंच संतोष लोंढे यांनी सकल मराठा समाजातील नागरिकांना एकत्रित करुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन केले.यावेळी टायर जाळुन समाज बांधवांनी संताप व्यक्त केला.सरकारने बघ्याची भुमिका न घेता मराठा समाजाला तत्परतेने आरक्षण देण्याची मागणी करीत एक मराठा. लाख मराठा च्या घोषणा दिल्या.
शिंदे फडणवीस पवार सरकारच्या  विरोधात मनोगतातून संताप व्यक्त केला.मागणीचे निवेदन माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.सरपंच संतोष लोंढे,अनिल लोंढे,हरीभाऊ लोंढे,प्रविण टोंगळे,दिलीप लोंढे,संतोष भीमराव लोंढे,कानिफनाथ लेंडवे,रतिलाल लोंढे यांचेसह समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले  होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages