कुरुल येथे श्री संत बाळूमामा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

कुरुल येथे श्री संत बाळूमामा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

 कुरुल येथे श्री संत बाळूमामा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

 कुरुल (कटूसत्य वृत्त):- तीर्थक्षेत्र आदमापूर श्री संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील घोडके वस्ती या ठिकाणी हरिभक्त कीर्तन प्रवचन मीनाताई भोंगे यांचे कीर्तन सोहळा पार पडला. तर पुण्यतिथीनिमित्त व नितीनियमाप्रमाणे  संत बाळुमामाची आरती त्यांनतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. सदर कार्यालयास बाळूमामा बघा नंबर 11 चे कारभारी श्री.सांगोलकर व उपकारभारी श्री.धनाजी मदने यांच्या नेतृत्वाखाली शेतमालक जगन्नाथ खेला घोडके यांच्या तळावर मागील तीन दिवसापासून आहेत.

सदर कार्यक्रमास कार्यक्रमास कुरुल, अंकोली, सय्यद वरवडे व शेजबाबुळगाव या गावांसह पंचक्रोशीतील शेतकरी व बाळूमामाचे भक्त मोठ्या संख्येने हजर राहून बाळुमामाची पुण्यतिथी उत्साहात आनंदात साजरी केली. बाळुमामाची आरती झाल्यानंतर मेघराजाने गर्जनेसह पावसाची सुरुवात केल्याने शेतकरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages