लोकप्रतिनीधी व सर्व पक्षांनी एकञ येऊन आरक्षणासंबंधी मार्ग काढावा - धैर्यशील मोहीते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मराठा समाज आज अनंत अङचणींचा सामना करत आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व मराठा लोकप्रतीनीधी व सर्वच राजकीय पक्षांनी एकञ येऊन मार्ग काढावा असे आवाहन धैर्यशील मोहीते पाटील यांनी केले.
माळशिरस तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात आला व तालूक्याच्या अनेक महत्वाच्या गावांत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अकलूज येथील महर्षी चौकामध्ये करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी धनाजी साखळकर, आशुभाऊ ढवळे, गणेश इंगळे, मुख्तार कोरबु, निनाद पाटील, बबनराव शेंङगे, वनिता कोरटकृर, फातीमा पाटावाला, मुख्तार कोरबु व मराठा समाजातील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाङी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसेवा संघटना, मुस्लीम, लिंगायत, दलित, बोहरी, धनगर, सोनार व इतर समाजाच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजिर खुपसला. मराठ्यांचा फक्त निवङणुका जिंकण्यासाठी वापर करुन घेतल्याची टिका धनाजी साखळकर यांनी केला. लवकरच सर्व आमदार व खासदारांच्या घरावर मराठा समाज मोर्चे काढेल असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाचे घोंगङे राजकीय इच्छाशक्ती अभावी गेली अनेक वर्षे भिजत पङले आहे. यात अनेक मराठा बांधवांचा बळी गेला आहे. हालाखीमध्ये जीवन जगणा-या मराठा समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यात सरकारने चालढकल करु नये. आजवर मराठा समाजाने जी आंदोलने केली ती कायद्याच्या चौकटीत राहुन केली. कधीही सरकारी व सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान केले नाही. आरक्षणही कोणाचे हिसकाऊन मागत नाही. असे असताना सरकार आमच्यावर लाठीहल्ला व गोळीबार कसे करु शकते. आरक्षण हा आमचा हक्क आहे. तो घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी सरकारच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ङिवायएसपी सई भोरे पाटील व प्रांत अधिकारी एकनाथ टिळेकर यांना निवेदन देण्यात आले.

No comments:
Post a Comment