मध्यरात्री बाहेर पडले समाजाचे फंड; पहाटे एकत्रित आल्या ४० ज्योती चौडेश्वरी देवी : पाच सादर केली देवीची भक्तिगीते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

मध्यरात्री बाहेर पडले समाजाचे फंड; पहाटे एकत्रित आल्या ४० ज्योती चौडेश्वरी देवी : पाच सादर केली देवीची भक्तिगीते

 मध्यरात्री बाहेर पडले समाजाचे फंड;

पहाटे एकत्रित आल्या ४० ज्योती

चौडेश्वरी देवी : पाच सादर केली देवीची भक्तिगीते


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सायंकाळी श्रींची पालखी निघाली. मध्यरात्री समाजाचे आठ फंड ज्योती घेऊन बाहेर पडले. देवीची भक्तिगीते पाच तास सादर करीत पहाटे चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात आले... सर्व फंडांच्या मान्यवरांच्या सत्कारानंतर ज्योती दुधाने शमवल्या.
हा सोहळा होता तोगटवीर क्षत्रिय समाजाच्या ज्योती उत्सवाचा. ज्योती उत्सवानंतर सकाळी घरात-घरातून देवीला नैवेद्य देण्यात आला.

चौंडेश्वरी वरप्रासादिक तोगटवीर क्षत्रिय समाजाची कुलस्वामिनी चौंडेश्वरी देवीच्या प्रकटदिन, प्रतिष्ठापना दिन व नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवारी पार पडला.
सकाळी ७.३० वाजता सर्व ४० ज्योती कन्ना चौकात चौंडेश्वरी देवी मंदिरासमोर आल्या. अध्यक्ष आनंद बडगंची यांच्या हस्ते प्रत्येक फंडाच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी आदल्यादिवशी प्रत्येक फंडातील मान्यवर रात्री नऊ वाजेपर्यंत समूहाने येऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परत जाऊन मध्यरात्रीच्या ज्योतीची तयारी केली.
ज्योत उत्सवानंतर गुरुवारी सकाळी ८.३० ते दुपारी चारच्या दरम्यान घराघरांतून देवीला नैवेद्य आला. तसेच समाजातील काही बांधव महिनाभर तर काही गृहिणींनी पाच दिवसांचा उपवास फराळाने सोडला.

यावेळी उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उदगिरी, सचिव नारायण बत्तूल, सहसचिव अनिल कंदी, उपाध्यक्ष (मुंबई) राजेंद्र चिला, खजिनदार नागनाथ मावकुंटे उपस्थित होते.


मध्यरात्रीच्या ज्योतींनी
सोलापूरकरांचे वेधले लक्ष

कुंभार वेशीतून चौडेश्वरी फंड, घोंगडेवस्तीतून नलगेशी फंड, साखर पेठेतून साखर गट्टी फंड, सोमवार पेठेतून साखर पेठ फंड, कन्ना चौकातून चेला फंड,
नंगी फंड, डक्का फंड आणि तेद्दीफंड ज्योत घेऊन बाहेर पडले. काळामारुती मंदिराजवळ युवक संघटनेच्या वतीने समाजबांधवांसाठी दुधाची व्यवस्था केली. ४० ज्योतींची मिरवणूक अशिकल मैदानाजवळून कन्ना चौक येथील चौडेश्वरी मंदिरात ज्याेती एकत्रित आल्या.

दुधाने ज्योत केली शांत ..

मध्यरात्री ते पहाटे दरम्यान देवीची गाणी गात निघालेल्या ज्योतसोहळ्यांनी सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी अध्यक्षांच्या हस्ते दुधाने या ४० ज्योती शांत करण्यात आल्या. तत्पूर्वी देवीची आरती करण्यात आली. या ज्योत उत्सवादरम्यान जवळपास २० हजार बांधव उपस्थित होते. ---
तरुणाईचा सहभाग

* मध्यरात्री निघालेल्या आठ फंडमध्ये तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता.
* प्रत्येक फंडातून पाच-पाच ज्योती घेऊन तरुण आले.

* पहाटे ४० ज्योती साखर पेठेतील बनशंकरी मंदिराजवळ एकत्रित आल्या. येथे तरुणांनी देवीचा जयजयकार केला.
* समाजातील फंड देवीच्या मंदिरापर्यंत येईपर्यंत पाच तास भजन, भक्तिगीते सादर केली.

* या ज्योती शांत करण्यात आल्यानंतर समाजातील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages