Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.हरी भोसले यांना राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान..!

 डॉ.हरी भोसले यांना राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आरोग्य क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेवक धर्म स्वीकारून कौतुकास्पद काम केल्या बद्दल आरोग्यम भारत, सी.  एन .इ. टी.  एस.  एन .ओ. एन .डी .ए. आणि सोलापूर नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी डॉ हरि कृष्णा भोसले  यांना महाराष्ट्र निसर्गोपचार तज्ञ परिषदे च्या अध्यक्षा  ज्योती शेटे यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी होते. अक्कलकोट रोडवरील वळसंग वाडा निसर्ग विहार  येथे हा कार्यक्रम थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य व भारत देशभरात निसर्गोपचार या आरोग्य क्षेत्रा मद्ये निरंतर सेवादान - योगदान, समर्पण या बद्दल हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी  डॉ.  हरी भोसले यांची निवड करण्यात आली आहे.  या वर्षाचा  "राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार: 2023-24,  डॉ हरी भोसले यांना  देऊन त्यांना यथोचित सन्मानपूर्वक गौरविण्यात आलं
यावेळी महारष्ट्र व देशभरातील  निसर्गोपचार तज्ञ डॉक्टरांना आरोग्य दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी  SNO - SOLAPUR व आरोग्यम् भारत अंतर्गत CNET PROGRAM तसेच राष्र्टीय पूरस्कार सन्मान सोहळा  या कार्यक्रमासाठी सोलापुर महानगरपालिकेचे आरोग्य उपअभियंता . नीलकंठ मठपती उपस्थित होते.  या प्रसंगी  योगीन गुर्जर , डाॅ. क्रांतीवीर महिंद्रकर आणि SNO चे अध्यक्ष डाॅ. श्रीकांत सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य लेखपाल व राष्ट्रीय टेनिस खेळाडू सिलव्हर मेडल विजेत्या संध्यारांनी बंडगर व सर्व निसर्गउपचार तज्ज्ञ, डॉकटर , समाजसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments