Hot Posts

6/recent/ticker-posts

कणबस (ग) ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात..!

 कणबस (ग) ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात..!


प्रभुलिंग बिराजदार यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवले

 भ्रष्टाचाराचे पुरावे....!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्यामुळे आणि खाबुगिरीला मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कुरण मिळू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ना खाऊंगा ना खाने दूंगा ही घोषणा या अधिकाऱ्यांनी पायदळी तुडवल्यामुळेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रभुलिंग बिराजदार यांनी श्रमिक पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त : - सोलापूर तालुक्यातील कणबस( ग)  ग्रामपंचायत  भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले असून सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी,  पंचायत समिती, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, जिओ पाणीपुरवठा दक्षिण सोलापूर, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अध्यक्ष/ सचिव या सर्व चांडाळ चौकडीने संगणमताने प्रचंड मोठी घोटाळ्याची मालिका उभा केली असून याच गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रभू लिंग बिराजदार यांनी पुराव्यानिशी हे प्रकरण उजेडात आणले आहे. आर्थिक अनियमितता, आणि संगणमताने घोटाळे करणाऱ्यांचं रॅकेट समोर आल्यामुळे पाच सप्टेंबर 2023 रोजी प्रभुलिंग बिराजदार यांनी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंताकडे भ्रष्टाचाराची पुरावे सादर केले आहेत. कणबस ग्रामपंचायत मध्ये पेजल योजना,  जलजीवन मिशन योजना , सिमेंट काँक्रेट रस्ते,  आणि घरकुल योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे बिराजदार यांनी दाखवून प्रशासनाची झोप उडविले आहे. दक्षिण सोलापूर पंचायत समिती ते ग्रामपंचायत अशीही साखळी असून सर्वच अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने माखले आहेत त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रभुलींग बिराजदार यांनी केली आहे. महा भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची मालिका उभी करणाऱ्या रॅकेटची संपूर्ण चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा ग्रामस्थांच्या समवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रभुलिंग बिराजदार यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments