Hot Posts

6/recent/ticker-posts

मटका-डान्सबारच्या तक्रारी माझ्यापर्यंत, पोलिसांनी दोन दिवसांत करावी कारवाई; गृहराज्यमंत्र्यांचे आदेश..

 मटका-डान्सबारच्या तक्रारी माझ्यापर्यंत, पोलिसांनी दोन दिवसांत करावी कारवाई; गृहराज्यमंत्र्यांचे आदेश..

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापुरातील मटका आणि डान्सबारच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत. शहरातील मटका व डान्सबारमुळे निर्माण होणाऱ्या गुन्ह्यांना व परिणामांवर पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करावी, असे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी पोलिसांना दिले.

गृहराज्यमंत्री बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी पोलिस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरांमध्ये चालणाऱ्या मटक्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सोसावा लागतोय. यावर कठोर पावले उचलण्याची गरज असून डान्सबारसंबंधीही जनतेतून रोष आहे. यासंबंधी काही तक्रारी आपणास थेट मिळाल्या आहेत. हे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत.

दोन दिवसांत या संबंधी कारवाई व्हायला पाहिजे, यासाठी आपण पोलिस प्रशासनाला आदेश दिल्याचे गृहराज्यमंत्री कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. ड्रग्जचे सेवन जगाबरोबरच महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. याला सोलापूरही अपवाद नाही. सोलापूर शहरामध्ये १०० हून अधिक शाळा, कॉलेजेस आहेत. ड्रग्जला रोखण्यासाठी शाळा- कॉलेजमध्ये जनजागृती करावी, अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments