Hot Posts

6/recent/ticker-posts

*महेश पिंगळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 60 दात्यांनी केले रक्तदान*

 *महेश पिंगळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 60 दात्यांनी केले रक्तदान*



 
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  टेंभुर्णी येथील महेश बापू पिंगळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले, पंढरपुर येथील पंढरपूर ब्लड बँकेने रक्त संकलन केले. तसेच या रक्तदान शिबिरा नंतर प्रत्येक रक्तदात्यास फळांची झाडे भेट देण्यात आली वृक्षारोपण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले, याचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे व हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला गेल्याचे बोलले जात आहे. सदर रक्तदान शिबिर ई. दहावीतील वर्गमित्र ग्रुप यांच्यावतीने आयोजित केले होते तसेच झी टॉकीज फेम कविराज महाराज झावरे यांचे सुश्राव्य असा कीर्तन सोहळा पार पडला यामध्ये टेंभुर्णी व परिसरातील सर्व नागरिक, नातेवाईक आणि महेश बापू चा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
कै.महेश बापू पिंगळे यांच्या मित्र परिवारातील मनोज नांगरे यांची नुकतीच चव्हाणवाडी गावच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल ही सत्कार महेश बापूंचे वडील दादा पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश पिंगळे शिवाजी भैय्या येवले पाटील , पांडुरंग चिवडे ,जाफर तांबोळी ,डॉ. सुहास अनंतकवळस अजित बेसुळके, सुनील कुठे, औदुंबर घळके, संतोष लाटणे, सचिन तांबे अमोल ताबे सुयश शहा, सुनील पवार, सिद्धेश्वर  गणगे, दीपक वाघमोडे संभाजी देशमुख, सिद्धेश्वर शिंदे, समाधान माने अनिकेत चौगुले,  शशिकांत पवार महेश तरटे, श्रीकांत जाधव सुधीर पाठमास सचिन पाठमास सुनील सुक्रे नितीन कदम, प्रवीण येवले पाटील आणि महेश बापू मित्रपरिवार , इयत्ता दहावी वर्ग मित्रपरिवार आणि कोटक महिंद्रा बँक मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments