Hot Posts

6/recent/ticker-posts

ई-चलन प्रलंबित दंड तडजोडीबाबत महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) यांना निवेदन सादर

  ई-चलन प्रलंबित दंड तडजोडीबाबत महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) यांना निवेदन सादर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे  जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) यांना ई-चलन प्रलंबित दंड तडजोडीबाबत महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.  

२०२५ या वर्षभरात सोलापुरात एकूण चार लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले असून, त्यापैकी तीन लोक अदालती यशस्वीपणे संपन्न झाल्या आहेत. आगामी लोक अदालत दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, या लोक अदालतमध्ये ई-चलन प्रलंबित दंडाची तडजोड, सवलत आणि दंड कमी करण्याबाबत महासंघाने मागणी केली .  



महासंघाचे पदाधिकारी व चालक प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाकडे खालील बाबींची मागणी केली:  

- ई-चलन प्रलंबित दंड तडजोडी प्रक्रियेला लोक अदालतमध्ये समाविष्ट करणे.  

- आर्थिक अडचणीत असलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांना दंडात सवलत देणे.  

- प्रलंबित प्रकरणे कमी करून चालकांना न्याय मिळवून देणे.  

या निवेदनाद्वारे सोलापूरातील हजारो चालकांच्या न्यायाच्या लढ्याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे.  

याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद ,प्रदीप शिंगे .इम्रान शेख,तुफान शेख,अल्लहबक्ष शेख,इरफान कल्याणी, रमेश बनसोडे,इर्शाद शेख,मनोहर खांडेकर,शंकर राऊत,सरफराज बागवान,इलाही कुरेशी,लाडजी नदाफ,इलियास सिद्दिकी,नागेश वाघमारे,राजू सिद्धगणे,फैयाज काजी,अशपाक शेख,मुजम्मिल शेख, अशोक बनसोडे,हनोक रावडे,मोहसीन बागवान, असलम शेख आणि असंख्य चालक उपस्थित होते.  

Reactions

Post a Comment

0 Comments