Hot Posts

6/recent/ticker-posts

बिनविरोध जागांचे श्रेय घेऊ नये- आ. देशमुख-साळुंखे पाटील

 बिनविरोध जागांचे श्रेय घेऊ नये- आ. देशमुख-साळुंखे पाटील




सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १ अ मधून राणीताई आनंदा माने आणि प्रभाग ११ अ मधून सुजाताताई चेतनसिंह केदार सावंत यांच्या झालेल्या बिनविरोध निवडीमुळे शहर विकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. या दोन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करताना *ही बिनविरोध निवड समन्वयातूनच शक्य झाली असून तिचे श्रेय घेण्याचा शहाजी बापू पाटील यांनी केविलवाणा प्रयत्न करू नये*, असा तीव्र इशारा सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि विधानपरिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी दिला.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आ. देशमुख, माजी आ.र साळुंखे-पाटील, शिवसेनेचे शहाजी बापू, भाजपचे बाळासाहेब केदार, बाळासाहेब एरंडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना सांगोला शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन* केले होते. त्यानंतर शहर विकास आघाडीने समन्वयाची भूमिका घेतली आणि त्यामुळेच बिनविरोध निवडी शक्य झाल्या, असे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले.“या निर्णयात शहाजीबापूंचा दूरवरही वाटा नसताना तेच श्रेय घेऊ लागले, हे दिशाभूल करणारे आहे,” असा टोला यावेळी दोन्ही नेत्यांनी लगावला.

नागपूर अधिवेशनातून परतल्यानंतर आपण सांगोला येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व घडामोडींवर सविस्तर भूमिका स्पष्ट करणार* असल्याचेही आ. देशमुख यांनी सांगितले.

 शहाजी बापूंची भूमिका बदलली – देशमुखांचा आरो. पालकमंत्र्यांनी दिलेल्या एकजुटीच्या आवाहनाला शहाजी बापूंनी सुरुवातीला नकार दिला आणि प्रचारादरम्यान त्यांनी पालकमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली. मात्र निकाल जवळ येताच त्यांची भूमिका बदलू लागली, असा आरोप आमदार देशमुख यांनी केला.
“सांगोला तालुक्यातील जनता आता भूमिका बदलणाऱ्यांना ओळखते. आगामी निवडणुकांत शहाजी बापूंना जनता योग्य जागा दाखवेल,” असा विश्वास आमदार देशमुख व माजी आमदार साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला.

आ. देशमुख म्हणाले, “मी शेकापचा आ. आणि दीपक आबा हे कोणत्याही पक्षात नसतानाही, शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही भाजपसोबत जाण्यास तयार झालो.
मात्र महायुतीत असूनही शहाजीबापूंना भाजपचे एवढे वावडे कसे? आम्ही शहरहितासाठी स्वार्थ बाजूला ठेवला, पण बापूंनी मात्र भाजपचे उमेदवार मारुती आबा बनकर यांना टोकाचा विरोध करून स्वतःचा स्वार्थच जपला.”

सांगोला तालुक्यात स्व. गणपतराव देशमुख आणि दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी अनेक वर्षे विकासप्रधान परंपरा राखली. तीच परंपरा पुढे नेण्याची घोषणा करत आमदार देशमुख म्हणाले,
“येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे-पाटील हे एकदिलाने राहणार आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका आम्ही एकत्रित लढवणार आहोत.”


Reactions

Post a Comment

0 Comments