बेगम पेठेत अतिक्रमण कारवाईदरम्यान शाब्दिक चकमक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 13, 2025

बेगम पेठेत अतिक्रमण कारवाईदरम्यान शाब्दिक चकमक

 बेगम पेठेत अतिक्रमण कारवाईदरम्यान शाब्दिक चकमक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (११ डिसेंबर) बेगम पेठ, मधला मारुती आणि कन्ना चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बेगम पेठेत कारवाईदरम्यान काही नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिस बंदोबस्तात अखेर अतिक्रमण हटविण्यात आले.

महापालिका अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे अभियान सुरू आहे. त्यानुसार सकाळी बेगम पेठेतील शिवसेना कार्यालयाजवळील अतिक्रमणे प्रथम काढण्यात आली. त्याचबरोबर वडापावाची टपरी जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली.

पुढील टप्प्यात मधला मारुती परिसरात कारवाई करत हारांच्या दुकानांसमोर ठेवलेले स्टॉक्स, काठ्या आणि इतर साहित्य हटवण्यात आले. सायंकाळी कन्ना चौक भागात रस्त्यावर अडथळा ठरणारी बँजोपार्टीची चारचाकी गाडी तसेच एक हातगाडी जप्त करण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.ही मोहीम महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार, उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणात आणि जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages