Hot Posts

6/recent/ticker-posts

लायन्स क्लब तर्फे पोलीस बांधवांना पाणी बॉटल वाटप

 लायन्स क्लब तर्फे पोलीस बांधवांना पाणी बॉटल वाटप





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटतर्फे बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. नॉर्थ पोलीस स्टेशन, अक्कलकोट येथे पोलीस बांधवांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करून एक प्रशंसनीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. क्लबचे अध्यक्ष लायन अभयजी खोबरे यांच्या सुकन्या सौ. दर्शना रोहन लेंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक भीताटे हे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना स्टील पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. पोलीस बांधवांच्या सेवाभावाला आदरांजली म्हणून आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पार पडला.

उपक्रमाचे वैशिष्ट्य

पोलीस बांधवांचा सन्मान करत त्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम
पर्यावरणपूरक स्टील बॉटलद्वारे प्लास्टिक मुक्ततेचा संदेश
समाजासाठी सदैव तत्पर” या ध्येयवाक्याची प्रभावी प्रचिती

या उपक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये—
ला. पंडीत – सचिव, ला. तेली – खजिनदार, ला. मल्लीकार्जून मसुती – झोन चेअरमन, PDG ला. MJF राजशेखर कापसे, ला. शिवपूत्र हळगोदे, ला. राजेंद्र हत्ते, ला. प्रभाकर मजगे, ला. गौरीशंकर चनशट्टी, MJF ला. महेबुब सलगरकर, ला. साखरे, ला. माळशट्टी, ला. शरीद वळसंगकर,ला. शिवशरण खुबा

सर्व मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटतर्फे सौ. दर्शना रोहन लेंगडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पोलीस बांधवांनी सतत निभावलेली निस्वार्थ सेवा आणि कर्तव्यदक्षता याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments