Hot Posts

6/recent/ticker-posts

बृहन्मठ होटगीमध्ये पुण्याराधना निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी

 बृहन्मठ होटगीमध्ये पुण्याराधना निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्याराधना निमित्त यंदाही विविध धार्मिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम साजरा होत आहे.

१५ ते १९ डिसेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ पारायण,१७ डिसेंबर रोजी भगवद्गीता श्लोक पाठांतर स्पर्धा,१८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आंतरशालेय कबड्डी व हॉलिबॉल स्पर्धा,२० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ७.३० ते ८.३० पारितोषिक वितरण, ८.३० ते ९.३० धर्मसंदेश व आशीर्वचन, तसेच रात्री १०.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत भजन असा कार्यक्रम होणार आहे.

बाळीवेस (उत्तर कसबा) मठातील कार्यक्रम १५ ते १९ डिसेंबर दरम्यान रोजी दुपारी ४ वाजता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज ग्रंथ पारायण, २० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता संगीत रुद्राभिषेक व महापूजा,१७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर (एस.व्ही.सी.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) आयोजित केले आहे.२० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तपोरत्नं महास्वामीजींची **बोरामणी येथून पालखी** निघून दर्गनहळ्ळी, कुंभारीमार्गे एमआयडीसी येथील श्री वीरतपस्वी मंदिरात आगमन होईल. तेथे पालखी स्वागत, महामंगलारती व महाप्रसाद वाटप होणार आहे.

१० ते २० डिसेंबर रोजी रोज सायंकाळी ७ वाजता पंडितरत्न वेदमूर्ती सिद्रामय्या शाखीजी यांचे तपोरत्नं महास्वामीजींच्या जीवनावरील प्रवचनांचे आयोजन आहे.१४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप,१५ ते १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथ पारायण,२० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता आत्मज्योत प्रज्वलन (चन्नयोगिराजेंद्र महास्वामीजी),२१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्रीं अभिषेक, बिल्वाचन, महापूजा, ८ वाजता आत्मज्योत मिरवणूक, दुपारी १ वाजता धर्मसभा व महाप्रसाद,२२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पाळणा कार्यक्रम, रात्री ९ वाजता आतषबाजीसह कार्यक्रमाची सांगता होईल.

जगद्गुरूंच्या उपस्थितीत आत्मज्योत प्रज्वलन २० डिसेंबर रोजी रात्री १०.१० वाजता श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत आत्मज्योत प्रज्वलन, गुरूनमन व श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. अनेक मठांचे महास्वामीजी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
तपोरत्नं महास्वामीजींनी आपल्या शिकवणीतून भक्तांच्या जीवनातील अज्ञानाचा अंध:कार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या पुण्याराधना कार्यक्रमात सहभागी होऊन तन-मन-धनाने सेवा समर्पित करावी, असे आवाहन बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments