Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राज्य सल्लागार पदी राजेश माळी यांची निवड

 महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राज्य सल्लागार पदी राजेश माळी यांची निवड





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 ची त्रेमासिक सभा दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी हॉटेल शौर्य लॉन्स जालना येथे राज्याध्यक्ष  संजीवजी  निकम  यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी राज्य युनियन चे सरचिटणीस सुचित भाऊ घरत  व सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सरचिटणीस विभागीय पदाधिकारी उपास्थित होते.
 सभेत रिक्त पदे भरणे बाबत सभागृह मध्ये चर्चा होऊन राज्यांतील सर्व जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, विभागीय पदाधिकारी यांनी रिक्त पदे भरणे चे अधिकार राज्याध्यक्ष आणि सरचिटणीस यांना बहाल केले होते जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यअध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, यांच्याशी तसेच सर्व राज्य युनियन पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष सरचिटणीस यांचे संमतीने सोलापूर जिल्ह्या युनियनचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण गळगुंडे यांचे विश्वासू समर्थक व माढा तालुका पंचायत समिती कुर्डूवाडी येथील कार्यक्षम,संयमी व संघटनात्मक चळवळीतील तरुण नेतृत्व राजेश माळी यांची निवड महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या "राज्य सल्लागार" या कॅबिनेट पदावर झाल्याचे पत्र त्यांना राज्य युनियनच्या वतीने देण्यात आले.
    या निवडीसाठी सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे मार्गदर्शक सुशेन ननवरे, पतसंस्था चेअरमन अशोक म्हेत्रे, व्हा.चेअरमन विलास माने, सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, सर्व तालुका अध्यक्ष सचिव तसेच जिह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments