योगेश पेढांबकर यांनी माहिती अधिकारात केले उघड

शासकीय कार्यालयांतील फलक बेकायदेशीर
लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त):- राज्यातील जिल्हा ते गाव पातळीपर्यंतच्या शासकीय कार्यालयामध्ये तसेच खेड भूमिअभिलेख कार्यालय, खेड येथील कार्यालयात लावण्यात आलेले फलक बेकायदेशीररित्या लावण्यात आले आहेत.हे माहिती अधिकार महासंघाचे चिपळूण तालुका प्रचार प्रमुख योगेश पेढांबकर यांनी महितीच्या अधिकारातून उघड केले आहे. अनेक शासकीय कार्यालया मध्ये सरकारी कर्मचार्यांना दमदाटी करणे, अजामीनपात्र गुन्हा, पाच वर्षांचा कारावास आणि दंड, असा मजकूर असलेले फलक लावण्यात आलेले आहेत.हे फलक लावण्यासाठी शासनाचे कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेले नसल्याची माहिती शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने माहितीच्या अधिकारात दिली आहे.
शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीतील ठरावानुसार राज्यभरातील सरकारी कार्यालायत असे फलक लावले गेले आहेत.वास्तविक असे फलक लावण्याबाबत राज्य शासनाने कार्यालयांना कोणतेही आदेश दिले नाहीत.
विशेष म्हणजे सामान्यवक्तींना जेथे नेहमी जाण्यास भीती वाटते,त्या पोलिस स्थानकाच्या कार्यालयातही असे फलक लावण्यात आले आहेत.
योगेश पेढांबकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये राज्य शासनाकडे माहिती मागवली होती.सामान्य प्रशासन विभागाने हे प्रकरण गृह विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगत टाळाटाळीची भूमिका घेतली यावर पाठपुरावा केल्यानंतर सुनावणी घेत राज्य शासनाला माहिती देणे भाग पडले.शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात लवण्यात आलेले आहेत हे फलक सामान्य माणसांना धमकावणायचा प्रकार असल्याचे मत योगेश पेढांबकर व्यक्त केले.खेड येथील भूमिअभिलेख कार्यालयात ते गेले असता भूमिअभिलेख सहायक यांनी परवानगी आहे म्हणून लावला आहे.लावण्याची परवानगी असलेले पत्र दाखवण्याची मागणी केली त्यावर माहिती अधिकार २००५ (अ) मागणी केली असता, भिंतीवरील लाकडी आयपीसी कलम असलेला लाकडी बोर्ड हटविण्यात आला, अशी माहिती योगेश पेढांबकर यांनी दिली.
0 Comments