Hot Posts

6/recent/ticker-posts

देशावर आलेल्या संकटास तोंड देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे:- शारदादेवी साळुंखे-पाटील

कोरोना बाधित नागरिकांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून कार्यतपस्वी आ. काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जवळा ग्रामस्थांच्यावतीने उद्या रक्तदान शिबिर. 

देशावर आलेल्या संकटास तोंड देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे:- शारदादेवी साळुंखे-पाटील 

सांगोला प्रतिनिधी :  संपूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून देणार्‍या कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यातील जनतेवर असुरक्षिततेचे सावट पसरले आहे. कोरोना मुळे राज्यात वाढत चाललेल्या रुग्णांची साखळी पाहता भविष्यात देशाला रक्ताची मोठी गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या सूचनेनुसार जवळा ग्रामस्थांच्या वतीने उद्या 3 मार्च रोजी जवळा जि.प.शाळा क्र.1 येथे स. 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशावर आलेल्या संकटाला सक्रियपणे तोंड देण्यासाठी सदरच्या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानाचे महान कार्य करावे असे आवाहन शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासन व प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूपासून देशामध्ये आणखी बळी जाऊ नयेत तसेच देशातील कोरोना बाधित ची संख्या लॉक करण्यासाठी देशामध्ये लॉक डाऊन चे आदेश दिले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे त्वरित प्रसार होतो. तसेच या विषाणू चा नाश करणारी औषधे अद्याप निर्माण झाली नसल्याने या रोगावर नियंत्रण ठेवणे कठिण झाले आहे. त्यामुळे भविष्यात जरी देशातील कोरोना बाधित लोकांची संख्या वाढली तर त्यांना रक्ताची कमतरता भासू नये व रक्ताविना जनतेचे प्राण जाऊ नयेत या उद्देशाने शरदचंद्र पवार यांच्या आव्हानास प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जवळा गावामध्ये शारदादेवी साळुंखे पाटील मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 
साळुंके पाटील कुटुंबिय यांचा जनसेवेत कायमच पुढाकार असतो. सध्या शासनाने पुकारलेल्या लॉक डाऊन च्या काळात दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचा निर्णय देखील निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्या जवळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित करून कोरोना रुग्णांची मदत केली जाणार आहे. त्यामुळे सदरच्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे तसेच कोरोना पासून सुटका करून घेण्यासाठी तालुक्यातील जनतेने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शारदादेवी साळुंखे-पाटील, जवळा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments