मुख्यमंत्री सहायता कक्षाला प्रा. रामदास झोळ फाउंडेशनकडून एक लाख रुपयांचा धनादेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

मुख्यमंत्री सहायता कक्षाला प्रा. रामदास झोळ फाउंडेशनकडून एक लाख रुपयांचा धनादेश

 मुख्यमंत्री सहायता कक्षाला प्रा. रामदास झोळ फाउंडेशनकडून एक लाख रुपयांचा धनादेश




करमाळा (कटूसत्य वृत्त):-   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप नेते प्रा. रामदास झोळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रा. रामदास झोळ फाउंडेशन, करमाळा तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता कक्षासाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

मुंबई येथे २१ जुलै २०२६ रोजी हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण व गरजू नागरिकांना तातडीची मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत निधीचा वापर केला जातो. अशा महत्त्वाच्या कार्यासाठी दिलेल्या या आर्थिक योगदानामुळे अनेक गरजू रुग्ण व आपत्कालीन परिस्थितीतील कुटुंबांना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रा. रामदास झोळ हे सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून, समाजोपयोगी कार्याला नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. यापूर्वीही सन २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता कक्षालाही एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली होती.
प्रा. झोळ यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. भविष्यातही अशाच प्रकारे समाजहिताचे उपक्रम राबवावेत, अशा शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages