आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गोर,गरिब वंचित, निराधार यांना फराळाचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गोर,गरिब वंचित, निराधार यांना फराळाचे वाटप

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त गोर,गरिब वंचित, निराधार यांना फराळाचे वाटप



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज दिनांक  25 जुलै 2026 रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने प्रथम आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी येत असतात विठ्ठलाच्या नावाने उपवास धरतात असतात अश्याच समाजातील गोरगरीब ,वंचित यांना उपवास धरता यावा व देवाची भक्ती करता यावी याकरिता सोलापूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने गोर,गरिब झोपडपट्टी मधील,व फुटपाथरावरील राहणाऱ्या गरिबांना फराळीमध्ये, शाबुदाना, केळी, वेफर्स, शाबू चिवडा, , शेंगा लाडू,शाबुवडा, इत्यादी वाटप  हर्षलभाई कोठारी ( सल्लागार आस्था सामाजिक संस्था), आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी,   संजय बन्साळी ( उद्योगपती) अनिल जमगे ( संचालक आस्था सामाजिक संस्था)सुहास छंचुरे ( आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख) योगेश कुंदुर ( संचालक आस्था सामाजिक संस्था,) वेदांत तालिकोटी, , नितिन भांडेकर,,यांच्या उपस्थितीत फराळीचे वाटप करण्यात आले
तसेच आस्था सामाजिक संस्था अविरतपणे गोर,गरिब, वंचित बेघर निराधार यांना मोफत अन्नदान करण्यासाठी सदैव तत्पर असते व आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा घरात कोणतेही कार्यक्रम असल्यास किंवा अन्य शिल्लक असेल तर आस्था सामाजिक संस्थेला संपर्क साधावे असे आनंद तालिकोटी आव्हान केले. 
हा उपक्रम राबवण्यासाठी महेश नागणसुरे, अनिल कपाळे, सुरज छंचुरे, प्रशांत छंचुरे, अथर्व शिंदे, वेदांत तमशेट्टी, अथर्व कोळुरे यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages