महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशालेत प्रवेश घेण्याचे आवाहन
.jpg)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नॉर्थकोट येथील महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळेत इयत्ता 9 वी, 11 वीसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
शहरात मध्यवर्ती ठिकाणी तांत्रिक प्रशिक्षण देणारी एकमेव शासकीय संस्था असून या प्रशालेने विविध क्षेत्रात अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. आज देखील प्रशालेची प्रशस्त इमारत व विविध विषयाच्या तंत्र कार्यशाळा त्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असून अनुभवी व तज्ञ तांत्रिक शिक्षक उपलब्ध आहेत.
शासनाने राष्ट्रीय - कौशल्य विकास योजनेअंतर्गत इतर सहयोगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या प्रशालेत तांत्रिक शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी म्हणून या प्रशालेचे केंद्र शाळेत रुपांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नवीन धोरणानुसार इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी, १२ वी (शास्त्र विभाग) विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषय (तांत्रिक विषय इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) घेवून शिक्षण पूर्ण करता येईल. या उपक्रमात सहभागी / संलग्न शाळा व कनिष्ठ महाविद्यालये जोडली जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.
पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम (इयत्ता ९वी/१०वी) इयत्ता ९ वी प्रवेशासाठी : मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (V२)=120 पदे, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (V३)=120 पदे.
वैशिष्ठ्ये : तांत्रिक शिक्षणाचा पाया रचला जातो, ७०+ ३० ( प्रात्याक्षिक+थेअरी) सरासरी टक्केवारीमध्ये वाढ होते. आयटीआय प्रवेशासाठी जागा राखीव, तंत्रनिकेतनमधील प्रवेशासाठी विशेष प्राधान्य, एनएसक्यूएफ आधारीत अभ्यासक्रम आणि हिंदी/समाजशास्त्र या विषयांना पर्यायी विषय उपलब्ध आहेत.
व्दिलक्षी अभ्यासक्रम (शास्त्र विभाग) इयत्ता ११ वी प्रवेश घेण्यासाठी आवाहन : इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स (A१) च्या 50 जागा, मेकॅनिकल मेन्टेनन्स (A२)च्या 50 जागा उपलब्ध आहेत.
वैशिष्ठ्ये : अभियांत्रिकी/तंत्रनिकेतन प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची तांत्रिक विषयाची पूर्व तयारी, ६०+४० ( प्रात्यक्षिक+थेअरी) सरासरी टक्केवारीमध्ये वाढ होते, तांत्रिक विषयाचे २०० गुण असल्याने सरासरी गुणांत वाढ होते, ग्रुप मार्कसाठी फायदेशीर, तंत्रनिकेतन थेट व्दितीय वर्षात प्रवेश, सीईटीव्दारे अभियांत्रिकी प्रथम वर्षात प्रवेश, मराठी व बायोलॉजी विषयांना पर्यायी २०० गुणांचे विषय, बीई, बी.टेक, एनडीए, बी.एस्सी, बीसीएस प्रवेशास पात्र राहतील.
0 Comments