अवैध चंदन वृक्षतोडप्रकरणी एक ताब्यात

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर वनपरिक्षेत्रात अवैध चंदन वृक्षाची तोड करुन अवैध चंदन माल (गाभा) तयार करीत असताना बापू अशोक बनसोडे (वय -42 रा. फुलचिंचोली) यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
पंढरपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सी.एस. वाघ, वनपाल एस.डी.बुरूंगळे, वनपाल टी.एस. दिघे, के.एस.कांबळे, बी.एस.मासाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यांनी बापू बनसोडे यांच्याकडील अवैधरित्या चंदन वृक्षाची तोड करुन तयार केलेला चंदनमाल (गाभा) आणि या कामास वापरलेले साहित्य जप्त केले.
30 जून रोजी आरोपी इसम कांबळे यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून मंगळवेढा न्यायालयाने सहा दिवसांची फॉरेस्ट कस्टडी दिली.
बनसोडे यांच्या घरी झडतीमध्ये सापडलेला चंदन, मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
0 Comments