काय झाडी, काय डोंगार,काय हाटेल फेम आ.शहाजी बापूचे आज सांगोल्यात आगमन

सांगोला (जगन्नाथ साठे):- संपूर्ण देशभर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या "काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल"फेम तसेच सांगोला तालुक्याचे विद्यमान लाडके आमदार शहाजी बापू पाटील यांचे आज मतदार संघात आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून त्याच्या समर्थनार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शहाजी बापूच्या काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल,या वाक्याची भुरळ पडलेली होती.आज मतदासंघांतील बदलत्या राजकीय पार्श्भूमीवर आजच्या जाहीर सभेत आम शहाजी बापू काय बोलणार?याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.आज सायं ५:३० वाजता या जाहीर सभेचे आयोजन सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे होणार असून सदर सभेसाठी तालुक्यातील शहाजी बापू प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
0 Comments