Hot Posts

6/recent/ticker-posts

जाहिरात जीवावर बेतली

 जाहिरात जीवावर बेतली

काजू बदाम सोडून आता 

     गुटखा प्रसिद्ध झाला 

अजय, अक्षय, शाहरूख सुद्धा 

     विमलच खा म्हणाला 

बंद झाल्या शिक्षण जाहिराती 

     जुगार प्रसिद्ध झाला 

हिंदी मराठी कलाकार सुद्धा 

     रमीच खेळा म्हणाला 

बंद झालेत मैदानी खेळ 

     मोबाईल वेडा झाला 

भर त्यात आय पी एल ची

     त्यातही जुगार आला 

ख्रिस गेल कपिल सुद्धा 

     केसरच खा म्हणाला 

पामोलीव्ह का जबाब नही 

     तो ही विसरून गेला  

जॅकी सुद्धा गायछाप खातो 

     तो ही तेच म्हणाला 

गुटख्या मुळेच कारखानदार इतका श्रीमंत झाला 

जुगार, दारू, सिग्रेट, गुटखा 

     इतका प्रसिद्ध झाला 

कुणीच नाही म्हणत याला 

     तुम्ही आळा घाला

बरबाद होत आहे तरुण पिढी 

     समाज व्यसनी झाला 

नाचवतो आणून गौतमी पाटील

     तरीही नेताच महान झाला 

विनंती करतोय एक तुम्हाला 

     स्वतःलाच बंधने घाला 

त्यांच्या होतात जाहिराती आणी 

     समाज बरबाद झाला ...

       ऑनलाईन जाहिरातींचा जाहिरातबाजी ने काळा बाजार सुरू केला..

 नव्या पिढीला बियर,व्हिस्की,रम सिगारेटचे व्यसनी बनवण्यासाठी शासनाने गुपित टॅक्स सवलती जाहीर केल्या...

शासनाने जाहिरातीला काही तरी बंधने घाला... 

स्वातंत्र्यात रक्त वाहून मिळालेला देश

नालायक वृती ठेऊन देश चालवता की देश व्यसनात बुडवायला निघाला..

आता तरी..

व्यसनाला आळा घाला...

Reactions

Post a Comment

0 Comments