Hot Posts

6/recent/ticker-posts

हुतात्मा एक्स्प्रेस च्या वेळापत्रकात बदल

 हुतात्मा एक्स्प्रेस च्या वेळापत्रकात बदल 

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांनी आता पाच मिनिटे लवकर यावे लागणार आहे. कारण आजपासून म्हणजेच ५ मे पासून पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी नियमित वेळेपेक्षा पाच मिनिटे लवकर म्हणजेच सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मध्य रेल्वेने गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते, तिच्या निर्धारित वेळेच्या ५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी गेल्या अनेक महिन्यांपासून सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सोलापूरच्या दिशेने धावते. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडीच्या वेळेत झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही, असे ही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments