Hot Posts

6/recent/ticker-posts

मोडनिंब येथे जुगार अड्डयावर टेंभुर्णी पोलिसांचा छापा

 मोडनिंब येथे जुगार अड्डयावर टेंभुर्णी पोलिसांचा छापा

मोडनिंब  (कटूसत्य वृत्त):- मोडनिंब येथील मार्केट यार्ड येथील पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई दि. 3 रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डातील पत्र्यात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा कारवाई केली. याप्रकरणी अनिकेत नागनाथ परबत (वय २८, रा. बावी, ता. माढा), सारंग सुभाष ओहोळ (वय २९, रा. आंबेडकरनगर, मोडनिंब ता. माढा), समंदर सुरेश लोंढे (वय ३९, रा. तानाजी चौक, मोडनिंब, ता. माढा), महादेव धनाजी चव्हाण (वय ३५, रा. बावी, ता. माढा), सुरेश तुकाराम मोरे (वय ५२, रा. बावी, ता. माढा), अमित सुरेश गायकवाड (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मोडनिंब, ता. माढा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार रुपये मिळून आले. ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अपर पोलिस अधीक्षक, अजित पाटील, उपविभागीय अधिकारी करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चालक समाधान धोत्रे, कॉन्स्टेबल गणेश इंगोले, रशीद मुलानी यांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments