मराठा सेवा संघाचे १० ते १२ मे दरम्यान महाअधिवेशन
कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):-मराठा सेवा संघाचे महाअधिवेशन १०, ११ व १२ मे रोजी अकलूज येथे होणार असून, या अधिवेशनात माढा तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील नियोजनासाठी कुर्डुवाडी येथे मराठा सेवा संघाची बैठक नुकतीच पार पडली, यात हा निर्णय घेण्यात आला. अकलूज येथे शनिवार १० मे रोजी अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून संध्याकाळी जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार ११ मे रोजी दिवसभर व्याख्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, सोमवार १२ मे बुद्धपौर्णिमा दिवशी नवोदित कवींचे काव्यसंमेलन, परिसंवाद, विशेष व्याख्याने होणार आहेत, तर समारोप व कृतज्ञता समारोहाने या अधिवेशनाची सांगता होईल. या महाअधिवेशनात सहभागी
होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी शिंदे यांनी केले आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक राजाभाऊ व्यवहारे, सर्जेराव भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुहास टोणपे, प्रसिद्धीप्रमुख विजयकुमार परबत, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा नीता खटके, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, माढा तालुका उपाध्यक्ष अरुण जगताप, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महादेव थोरात, सहसचिव दत्तात्रय गरदडे, संघटक शेखर सुर्वे, विनोद शिंदे, संतोष वीर, दिलीप चव्हाण, शहराध्यक्ष सचिन महिंगडे, उद्योजक कक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास कन्हेरे, शंकर उबाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्यालयीन सचिव शंकर नागणे, तालुकाध्यक्ष अविनाश पाटील, अविनाश नांगरे, नीरज उबाळे, शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.
0 Comments