शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ३० जूनपर्यंत : बावनकुळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ३० जूनपर्यंत : बावनकुळे

 शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ३० जूनपर्यंत : बावनकुळे       


 

      मुंबई (कटूसत्य वृत्त): राज्य शासन शेतकरी कर्जमाफीबाबत ३० जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे  यांनी दिली. ‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  या विषयात सकारात्मक असून, ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांनाच कर्जमाफी देण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकरी आंदोलकांनी ३० जूनपर्यंत संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.


शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार बच्चू  कडू यांनी आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जून २०२६ पर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.


समितीचा अहवाल एप्रिलमध्ये अपेक्षित असून, त्यानंतरच राज्यावर किती आर्थिक बोजा पडणार याचे स्पष्ट चित्र समोर येईल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी थेट निधीची तरतूद होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.


दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages