चिकमहूदच्या कुस्ती मैदानात ओम माने विजयी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

चिकमहूदच्या कुस्ती मैदानात ओम माने विजयी

 चिकमहूदच्या कुस्ती मैदानात ओम माने विजयी



महूद (कटूसत्य वृत्त): चिकमहूद (ता. सांगोला) येथील ग्रामदैवत Tamjai Devi यात्रेनिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात ओम माने विरुद्ध रोहन जाधव यांच्यात रंगलेल्या लढतीत ओम माने याने गुणांवर विजय मिळविला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही लढत रंगली.


याच मैदानात अतुल काळेल, शुभम हाके आणि विराज दिघे या मल्लांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळविला. चिकमहूद ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. मैदानाचे उद्घाटन दिग्विजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार शहाजी पाटील, रावसाहेब मगर, जिल्हा परिषद सदस्य दादा लवटे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर, उमेश पाटील, सरपंच शोभा कदम, सुरेश कदम आदी उपस्थित होते.


प्रमुख लढतींचे निकाल


अतुल काळेल (विटा) यांनी कल्याण नाईकनवरे (कोल्हापूर) यांच्यावर विजय मिळविला.

शुभम हाके (वाखरी) यांनी दादा घुले (अकलूज) यांना पराभूत केले.

विराज दिघे (महूद) यांनी पवन शिंदे (वाखरी) यांच्यावर मात केली.

रणजित मदने (बंडगरवाडी) यांनी संभाजी चव्हाण (अकलूज) यांना हरविले.

सुमित महारनवर (महूद) यांनी पियुष वाडेकर (खवासपूर) यांच्यावर विजय मिळविला.

करण नागणे (बामणी) यांनी सुजित अटकळे (खवासपूर) यांना पराभूत केले.

पृथ्वीराज मरगर (महिम) यांनी गणेश लोखंडे (खुडूस) यांना आसमान दाखविले.

मैदानातील इतर काही प्रमुख कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या.

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल


यात्रेनिमित्त तंजाई देवी  मूर्तीला वेदमूर्ती राजनशास्त्री हिवरकर व वेदमूर्ती चैतन्यशास्त्री हिवरकर (घनपाठी) यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. २१ जोडप्यांकडून देवीची महापूजाही पार पडली.


महानवर मळ्यातील मानकऱ्यांनी देवीचा पालखी उत्सव साजरा केला. तसेच महद येथील महाजन यांच्या कावडीसह परिसरातील कावडींनी हलग्यांच्या कडकडाटात देवीला अभिषेक केला. कावडी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी देवीच्या दैत्याला नैवेद्य कार्यक्रम झाला असून, आज शुक्रवार (दि. २०) रोजी ‘लावण्यखणी’ हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages