मोहोळ तालुक्यात मुलींनीच मारली बाजी .
तालुक्याचा एकूण निकाल ८३.७० टक्के
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तालुक्याच्या निकालात यावर्षी मुलींनीच बाजी मारली. तालुक्यातून २८३५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. २३७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल ८३.७० टक्के लागला. तालुक्यातील विज्ञान, कला व कॉमर्स अशा आठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. यंदामुलींचा एकूण निकालाचा टक्का ९४.८, मुलांचा एकूण निकाल ७६.८ असा राहिला. शहरातील नेताजी शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला. त्यात प्रथम सानिका घोलप ८७.६७, व्दितीय महेक तांबोळी ८६. १७, तृतीय प्रणिती नीळ ८५ टक्के या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नेताजी विद्या विकास मंडळाचे चेअरमन डॉ. एम.ए. गायकवाड, अध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील, प्राचार्य दत्तात्रय काशीद यांनी अभिनंदन केले. नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा कला शाखेचा निकाल ५३.३३ टक्के लागला. यामध्ये प्रथम साक्षी राऊत ८७.३३ टक्के, द्वितीय आरती मेथे ७५.१७, तृतीय सम्राज्ञी तुपसमिंदर ७० टक्के, वाणिज्य विभागचा निकाल ९८.११ टक्के लागला. त्यात प्रथम प्रथमेश चंदनशिवे ८९.१७ टक्के, द्वितीय ऐश्वर्या रोकडे ८७.३३ तृतीय प्रणाली रोकडे ८३.५० तर विज्ञान शाखेचा निकाल ८९.९३ टक्के लागला. त्यात प्रथम तरन्नुम शेख ७१.१७, द्वितीय ओम मोटे ७१ टक्के, तृतीय श्रीतेज मोटे ६३.८३ या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य वशीर बागवान, उपप्राचार्य पी. एस. शिंदे आदींसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ८७.६ टक्के लागला. त्यात प्रथम स्नेहल मोटे ७९.१७, द्वितीय स्वरांजली मळगे ७१.५०, तृतीय श्रेयस उन्हाळे ७०.६७ तर कला शाखेचा निकाल ५६ टक्के लागला. त्यात प्रथम स्वरांजली लेंगरे ६८.५०, द्वितीय पुनम हावळे ६७.३३, तृतीय शुभांगी कांबळे ६४. १७ या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष यशवंत गुंड, प्राचार्य सुधीर गायकवाड, उपाध्यक्ष संतोष गायकवाड आदींनी अभिनंदन केले. देशभक्त संभाजीराव गरड कनिष्ठ महाविद्यालय मोहोळचा विज्ञान विभागाचा निकाल ७९.६० टक्के लागला. त्यात प्रथम वरद ऐतवाडे ७५ टक्के, द्वितीय आर्या गुंड ७२ टक्के, तृतीय अभिनव थिटे ७० टक्के तसेच व्यवसाय अभ्यासक्रमात प्रथम प्रेमराज डोंगरे ८७.३३, द्वितीय अथर्व इंगळे ७६.३३, तृतीय काजल चव्हाण ७१.१७ या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. महाविद्यालयाचे सचिव प्रतापसिंह गरड, खजिनदार प्रवीणसिंह गरड व प्राचार्य एन.जे. पाटील आदींनी अभिनंदन केले. मोहोळ तालुक्यातील एकूण २६ महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणधिकारी अविचल महाडिक व शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
१०० टक्के निकाल लागलेली महाविद्यालये
विज्ञान शाखा - भैरवनाथ विद्यालया अंकोली, देशमुख प्रशाला कामती, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल, सैफन कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ, एम. बी. देशमुख प्रशाला कामती, कला शाखा - दाजी काका गोडबोले प्रशाला कामती, अमोगसिद्ध प्रशाला कोरवली, कॉमर्स शाखा -देशमुख प्रशाला कामती

निकालाची उत्सुकता आणि धाकधुक
सोमवारी निकाल असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधुक वाढली होती. निकालानंतर शहरात विद्यार्थ्यामध्ये 'कही खुशी, कही गम' असे वातावरण होते. अपेक्षीत गुणन मिळालेले विद्यार्थी वारंवार ऑनलाईनवर निकाल तपासत होते. कमी गुण मिळालेल्या पाल्यांचे पालक मात्र पुन्हा टेन्शनमध्ये आल्याचे दिसून येत होते.

0 Comments