जम्मूला निघालेल्या जवानाकडून टीटीईने ट्रेनमध्येच लाच मागितली लाच
मुंबई (कटूसत्य वृत्त):-हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करातील जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्वाल्हेर येथून डयुटी जॉईन करण्यासाठी जम्मूला निघालेल्या जवानाकडून टीटीईने ट्रेनमध्येच लाच मागितली.
याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित टीटीईचे निलंबन करण्यात आले आहे. ग्वाल्हेरला राहणारे सुभेदार विनोद कुमार दुबे यांच्याकडे टीटीईने लाच मागितली. माळवा एक्स्प्रेसमध्ये टीटीईने त्यांच्याकडून आणि त्यांचे सहकारी अग्निवीर यांच्याकडून लाच मागितली. ट्रेनमध्ये याप्रकरणी बाचाबाची करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी टीटीई व्हिडीओ बनवण्यासाठी मनाई करताना दिसत आहे. दलजित सिंह असे या टीटीईचे नाव असून तो लुधियाना डिव्हिजनमध्ये तैनात आहे.
0 Comments