Hot Posts

6/recent/ticker-posts

तरुणाईने नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळावे- खा. धैर्यशील मोहिते पाटील

 तरुणाईने नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळावे- खा. धैर्यशील मोहिते पाटील



मराठा सेवा संघाच्या वतीने महाअधिवेशन


अकलूज (कटूसत्य वृत्त):- ३५ वर्षात मराठा सेवा संघाने वैचारिक व पुस्तकांच्या माध्यमातून मराठा समाजास धाडसाने जुन्या रूढी-परंपरातून बाहेर काढण्याचे कार्य करून समाजाला सातत्याने दिशा देण्याचे काम केले असून तत्कालीन परिस्थिती व आजच्या परिस्थितीत मोठा बदल झाल्यामुळे आज तरुणाईला विचारमंथनातून नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
शंकरनगर येथील स्मृतिभवनात मराठा सेवा संघाच्या वतीने १० ते १२ मे २०२५ दरम्यान तीन दिवसीय महाअधिवेशन अयोजित करण्यात आले असून अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, आ. उत्तमराव जानकर, शिवतेजसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, निर्मलकुमार देशमुख, कामाजी पवार, नेताजी गोरे, नवनाथ घाडगे, अर्जुन तनपुरे, लक्ष्मण महाडिक, सूरज देशमुख, नितीन जाधव, विजयकुमार ठुबे, विलास पाटील, राजेंद्रसिंह पाटील, प्रभाकर झोड, मनोज आखरे, संभाजी पवार, मधुकर मेहेकरे, सीमाताई बोके, मीनाक्षी जगदाळे, उत्तमराव माने, आशाताई माने यांच्यासह सोलापूर जिल्हा, पंढरपूर विभाग व माळशिरस तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून मराठा सेवा संघाची सविस्तर माहिती दिली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. सकाळच्या सत्रात मराठा सेवा संघ व ३३ कक्षाचे बळकटीकरण व पुनर्बांधणीसंदर्भात चर्चा झाली, अकलूज इतिहास व विकास हा माहितीपट सादर करण्यात आला.

चौकट 
पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शाहीर राजेंद्र कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला व महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आशा मोरजकर यांनी एकपात्री " श्री राज्ञी सखी जयति" प्रयोग सादर केला.
सायंकाळी माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संस्कृती यात्रा काढण्यात येऊन जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments